Monday 26 February 2018

आम्ही मराठीचे शिलेदार 🚩

नमस्कार मित्रानो,


सर्वाना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो .या दिवशी पासून आपण एक संकल्प करू कि मराठी भाषा आणि मराठी माणूस हा जगात आपली कीर्ती गाजवेल आणि या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू.....आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.!!!





लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी

आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥

आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥

येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी ||


Friday 23 February 2018

जपून चाल् पोरी जपून चाल..


जपून चाल्‌ पोरी जपून चाल
बघणार्‍या माणसाच्या जिवाचे हाल
लाडाने वळून बघायची खोड
नाजुक नखर्‍याला नाही या तोड
डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल
केसांत सुरंगी रंगात ग
विजेची लव्‌लव्‌ अंगात ग
खट्याळ पदराला आवर घाल


जिंकीत जिंकीत जातेस तू
ज्वानीचं गाणं हे गातेस तू
हासून होतेस लाजून लाल
उरात लागलेत नाचाया मोर
कोणाच्या गळ्याला लागेल दोर्‌?
माझ्या या काळजाचा चुकेल ताल


- मंगेश पाडगावकर

Wednesday 21 February 2018

Yes YOU CAN DO IT..



प्रयत्न किंवा Try एक common word जो सगळेच दैनिक आयुष्यात वापरतात पण किती जण ते करून पाहतात..?


स्वतःला विचारण्या जोगा प्रश्न आहे हा 😄

आयुष्यात चढ-उतार नेहमीच चालू असते पण पुढे तोच जातो जो प्रयत्न करायचे सोडत नाही हे काही मी नाही लिहलेल बऱ्याच Movies मध्ये Social Sites वर असे हजारो स्टेटस भेटतील तुम्हाला

बर का मंडळी स्टेटस Copy करून कोणासारख होता येत नाही, हा Fact आहे..

सगळे Bill Gates, Mark Zuckerberg सारखे College मधे last येऊन मोठे नाही होणार ते लोक झाले कारण त्यांनी मेहनत घेतली कदाचित त्यांनी प्रयत्न केला चुकले असतील भरपूर वेळा चुकले असतील पण प्रयत्न नसेल सोडला म्हणून ते आज तिथे आहेत..

आपल्या इथे मुलगी Scooty शिकताना पडली की परत मागे बसायला देखील घाबरते, मुल देखील हेच करतात काही जण Exam मध्ये Fail होतात काही आयुष्यात पण तुमचा भविष्यकाळ अर्थात Future तुम्ही आज काय करताय यावर अवलंबून असतो उद्या काय करणार आहे याला काडीमात्र किमंत नसते..

Exam मधे fail होणारे Kt Exam देऊन पास होतात म्हणा 😂

मित्रांनो, आयुष्यात जगणं कधी सोडू नका कदाचित तुमच्या एका smile साठी कोण तरी जगत असाव 😄 स्वप्न बघत रहा एखाद राहिल तर वाईट वाटून घेऊ नका रात्री झोपल्यावर अजुन एक बघा 😉

"Don’t stop chasing your dreams, because dreams do come true", Well Said by Bharatratna Sachin Tendulakar.





    

Monday 19 February 2018

ब्रेकअप पार्टी अर्थात प्रेमाची पुण्यतिथी ( भाग-२)


 हा माझा झालाय ब्रेकअप. आता मी नात्यातून बाहेर आलोय (जुने कपडे बदलून आल्यासारखे), मेरी भूल थी की मैने तुमसे प्यार किया...एक्सेट्रा एक्सेट्रा.. असा बिनधास्तपणा होता का पूर्वीच्या प्रेमवीरांत? नाही ना मग उगाच कशाला शिकवता आम्हाला... ब्रेकअपमुळे रोना-धोना बकवास आहे.
रिलेशनशीपची व्हॅल्यू नाही असं नाही.. ठेवतो आम्ही व्हॉटसअपला स्टेटस, सॅडटाईपमध्ये डीपी.. येतात मित्राचे चारदोन समजुतीचे फोन. त्यांनाही समधान मिळतं फ्रेंडशीप निभावल्याचं. पहिलाच ब्रेकअप असेल तर, नया है वह.. असे म्हणून काहीजण टॉर्चरही करतात, भडवे.. पण मॉम-डॅड जाम खूश असतात पोरगा सुटला म्हणून. मस्त असतं ब्रेकअप. त्याने साप कात टाकतो तशी पुनर्जन्माची भावना होत असावी..
ब्रेकअप एक-फायदे अनेक...बहुगुणी ब्रेकअप, आयुर्वेदिक ब्रेकअप अशा जाहिरातीही निघतील कदाचित. तो प्रोडक्ट वापरला की ब्रेकअपचा काहीच त्रास होणार नाही, अशा फायद्यावाल्या कॅचलाईन असतील त्यावर.
शेवटी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, असं समाजोपयोगी वाक्य ही ब्रेकअपवाली मंडळी वापरतात म्हणे. त्यामुळे त्यांच्या पदरी मनाचे श्‍लोक म्हणल्याचे पुण्यही आपोअप पडतं. जब दिल ही टूट गया तो जिके क्या करे.. असा बुझदिल विचार थोडाच करायचा असतो.. बी पॉझिटिव्ह..
हां, आहोत आम्ही दुःखात, ओरडून सांगून टाकायचं जगाला सोशल मीडियाच्या कट्‌ट्यावरून (वॉलवर). करायचं दुःख साजरं म्हणजे सेलिब्रेशन म्हणा हवं तर. नाही तरी आपली इंडियन कल्चर करतेच की मरण दिन साजरा. पुण्यतिथी करणं तरी काय असतं वेगळं, दुःखाचं सेलिब्रेशनच ना. मग पार्टी देऊन ब्रेकअप सेलिब्रेट केले तर बिघडलं कुठं. आमच्यासारख्या रंडक्यांच्या (बिनमैत्रिणीच्या) पोटात दुखायचं काय कारण. दुःख साजरं करते ही जनरेशन म्हणजे आपुल्या मरणाचा सोहळा साजरा करते, तुकोबारायांसारखा. केवढा उदात्त विचार. हजार कीर्तन अन सत्संगाचे कार्यक्रम ऐकल्यानंतरही एवढं तत्त्वज्ञान पदरात पडलं नसतं तेवढं एका  ब्रेकअपमुळे येतं. (थॅक्स सोनू, मनू..) याबद्दल तिला शतकोटी धन्यवादच द्यायला हवेत.
दहावा-तेरावा, पुण्यतिथीचं आडवा हात मारून जेऊन येता, तसं मरण दिन प्रेमाचा (ब्रेकअप) सेलिब्रेट केला तर बिघडलं कुठं. शेवटी दुःखात पार्टीसिपेट झालेल्यांचा कडूघास काढावाच लागतो ना. म्हणून द्यावी लागते ब्रेकअपची पार्टी. उद्या कोणी म्हणाले, आताच ब्रेकअप पार्टीत गुलाबजाम खाऊन आलो पोटभर...तर तुमच्या पोटात दुखायचं काय कारण. शेवटी हा उदात्त विचार आहे.
ब्रेकअप झालाय माझा, हे सांगण्यात डबल बेनिफीट असतो. एक तर आपल्यावर कोणीतरी प्रेम केलं होतं हे कळतं, हे सांगताना छाती फुगून येते छपन्न इंचाची (नमोसारखी) ते वेगळंच. आणि असेल तर कुणी पोरगी कतारमध्ये (लायनित) तर ती लगेच अप्रोचही होते. ब्रेकअपमुळे रडतकुडत बसण्यात पॉईंट नाही, असं मानते ही जनरेशन. नाही तरी देवाचे तरी प्रेम कुठे सक्सेस झालेय. कृष्णामुळे राधेचा झालाच ना ब्रेकअप. मिरा राहिलीच ना रडत आयुष्यभर, अनारकली गाडली गेलीच ना भिंतीत सलिमसाठी. आर्ची-परशाचा झालाच ना घात.. इथे आमची राधा सोडून गेलीय तरी आम्ही आहोतच ना जिवंत.. सीर सलामत तो गर्लफ्रेंड पचास.. (शेवटी एकदाच माणूस जन्म मिळतो बरं का, उगाच कशाला सुसाईड-बिसाईड करायचं) केवढा क्रांतिकारी विचार आहे हां. फ्युचरमध्ये पटेल सगळ्यांना...
प्रेम असते लग्नाआधीची चाचणी अन ब्रेकअप असतो घटस्फोटाची रंगीत तालिम... एकाच जोडीदाराला किती काळ कवटाळून बसणार. जुने जाऊ द्या मरणालागुनि.. उगाच नाही म्हणाले मर्ढेकर. जमाना बदललाय, परिवर्तन संसार का नियम है...
रात गयी बात गयी
रिश्ता नया सोच नई
‘प्रेम’से बोलो ब्रेकअपवाले बाबा की जय...


Saturday 17 February 2018

पराक्रमी, कर्तुत्वत्वान महान राजाचा शिवजन्मोस्तव 🚩




यशवंत, कीर्तिवंत !

सामर्थ्यवंत, वरदवंत !!
पुण्यवं, नीतिवंत, जाणता राजा !!


छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की, ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत राजाच नव्हता, तर तो आदर्श नीतिवंत राजा होता.

महाराजांच्या गनिमी काव्याच्या तंत्राचा आत्मा होता, ‘वेग’, तूफान वेग आणि त्यात हत्ती आणि त्यांची संथ गती बसत नव्हती. म्हणून महाराजांनी युद्धात हत्ती वापरले नाहीत. सर्व आलमदुनिया त्यावेळी हत्ती हे प्रमुख साधन वापरत असताना महाराजांनी नवीन वाट चोखाळली आणि हत्ती हा प्राणी आणि त्याच्या चाली महाराजांनी गनिमीकावा या युद्धपद्धतीतून वगळून टाकल्या. हेच ते महाराजांचे वेगळेपण. “जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही अन् जे महाराजांनी केले, ते जगाला कधीच करता आले नाही.” म्हणून जगाला महाराजांसमोर कायम वाकावे लागते.

आज, महाराजांचे नाव वापरुन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. सत्ता व मतांच्या राजकारणासाठी शिवाजी महाराज फक्त आमचेच आहेत, अशी जणू स्पर्धाच लागलेली असते. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, छत्रपतींच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांचा महाराष्ट्रात सुकाळ आहे, पण त्यांच्या विचारांना कृतीत आणणाऱ्या लोकांचा मात्र दुष्काळ आहे. आपण शिवचरित्र, महाराजांच्या गुणांना किती आत्मसात केले आहे? महाराज संपूर्णत: निर्व्यसनी होते. आज आपले पुढारी, राज्यकर्ते निर्व्यसनी आहेत का? त्यांनी आखून दिलेली जीवनपद्धती, राबवलेली राज्यपद्धती, यांचा मात्र सपशेल विसर पडलेला आहे.

शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष मोठ्या अभिमानाने आपण करतो. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि रोमांचित आठवणींचा जयजयकार करतो. जसा जसा शिवजयंती उत्सव जवळ येत जातो, तस तसे, आपले “डीपी” बदलायला लागतात. शिवजयंतीचा दिवस मावळायला लागतो आणि मागे मात्र अंधार उरतो. उत्सवी सोहळे साजरे करण्यापुरतेच शिवरायांना आपण सीमित ठेवणार आहोत का? याचा विचार करण्याची आता नितांत गरज आहे. कदाचित यातूनच आचार-विचारांचा उष:काल निर्माण होईल, हीच अपेक्षा.

Friday 16 February 2018

ब्रेकअप पार्टी अर्थात प्रेमाची पुण्यतिथी.. ( भाग -१)



तुझं माझं नातं आता संपलंय.., आय एम सॉरी.., लिव्ह मी अलोन.., तू मला विसरणंच योग्य राहील दोघांसाठीही.., अशी न उमगणारी वाक्य धडाधड कानावर पडतात हल्ली, मग याला काय म्हणायचं.. प्रेमाचा ढेकर आला की ओकारी आली...
मग व्हॉटसअपच्या माध्यमातून मोबाईल नावाच्या इटुकल्या यंत्रातून गम-ए-जुदाईच्या मेसेजचा नुस्ता धबधबा वाहतो. त्यामुळे आम्ही सरावलो आहोत म्हणा. आणि हां वरचा माहोल पाहून समजू जातो, यंदा ब्रेकअप आहे... या जोडप्याचा.
गळ्यात गळे घालून तळ्यात पाय सोडून बसणारे, शोन्या, बाबू, पिल्लू, मनू, राजा, बाळा अशा प्रेमाच्या नावाच्या बारशावेळी पिझ्झा अन चॉकलेटरूपी घुगर्‍या वाटून ठेवलेल्या  नावाची एकदम किळस यायला लागते यांना, (जणू काही बर्गरमध्ये एखादी पाल निघाल्यासारखी..) कम्मालंय बुवा.. या लफडेवाल्यांची आय मीन प्रेमवीरांची.
काल-परवापर्यंत नात्यासाठी अधिर झालेली पोरं वर्षा-दोन वर्षांतच कशी बधीर झालीत, हे नागराज मंजुळे अन अजय-अतुलच काय पण कृष्ण-राधेलाही कळणार नाही. हे आम्ही चारचौघात सांगायला जातो तर.. ज्याने कधी तळ्यातील कमळं कमळीला सोबत घेऊन मोजली नाही, व्हॅलेंटाईन डेलाच कायपण फ्रेंडसशीप डेला सुद्धा ज्याचा हात सुना-सुना असतो (नवरा मेलेल्या बाईच्या कपाळासारखा). त्याने आम्हाला प्यार, इश्क, मोहब्बत शिकवू नये, असा टोमणा ऐकावा लागतो. त्यामुळे आम्ही तोंडघशी पडतो. पण शाहरूखने म्हणलेलंच हाय ना, कोई ना कोई चाहिए प्यार करने के लिए.. माझ्यासारख्या पोरींचा वारा न लागलेल्या माणसाला अशी गाणी धीर देतात. खरे तर लहानपणी अहंकाराचा वारा न लागो राजसा.. हा हरिपाठ सारखा म्हणल्यामुळेच आमच्या जवळपास कुणी फिरकत नाही...असं आमचा मित्र बबन्या विश्‍लेषण करतो.
प्रेमात पडल्यावर अनेक फ्रेंडस कवी झालेत, अन ज्याला हे जमलं नाही त्याच्या मदतीला सोशल मीडिया धावून आला, आपल्या कस्टमररूपी अशिलाची अब्रू वाचवालयला. कृष्णाने जशा द्रौपदीला एकापाठोपाठ एक साड्या दिल्या तशी व्हॉटसअपने अनेक प्रेम कविता पुरविल्या. प्रेमात वाहवलेले कवी देवदास होतात म्हणे पुढे. पण आता काही तशी सिच्युएशन नाही दिसत. क्योंकी अच्छे दिन आए है.. रिश्ता वही सोच नई, शेतकरी आत्महत्या करतात तशी जान देने की जरूरत नही. तू नही तो और सही और नही तो और सही... अशा आयडियालॉजीचा हा जमाना.. आमच्यासारखे लोक म्हणतील फालतू विचारसरणी आहे ही. पण याला म्हणायचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, रिश्ता वही सोच नई, नये जमाने की नई सोच..

Tuesday 13 February 2018

Priya Prakash Varrier, The Nation's Crush, Wants To Work With Sanjay Leela Bhansali

While the complete song is out, the next teaser of the film is slated to release soon. The film revolves around the love story of two students and warmth of friendship




Weekend Gone by seeing A Side Actor Who Becomes Star in her first movie Odu odar love. She is Malyalam Actress's We All Know Her as Expression Queen Priya prakash varrier The Overnight Star. 

"It happened spontaneously. This is my debut film and the director just Asked me to give expressions and it just went viral."


She further shared that her family and friends are excited. "My friends and teachers are very excited, happy and proud.  I want to thank all people who gave me love and support. I need prayers too. We are happy but don't know how to handle all this," She said 


Varrier shared that she always wanted to be an actor her aim is to Work with padmaavat
Director Sanjay Leela Bhansali. "I would definately want to Work in bollywood. Sanjay Leela Bhansali is the director I would want to Work with. I Have got a lot of offers from Malayalam, Tamil and Bollywood. But I Have not signed any other movie yet.




Valentine's Day Special Wishes



Marathi Wishes 


दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
Happy Valentine’s Day!



डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! 🙂
Happy Valentine’s Day!



पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!
Happy Valentine’s Day!




तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. 🙂
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!! 😉

Happy Valentine’s Day!


English Wishes 


If I wake up one day and I was asked for a wish, Mine would be that our love should last till we see fish on the tree and stars on the ground.
Happy valentines day my love.



Darling, my love for you is as deep as the sea and as high as the sky. Happy Valentine’s Day!


 A Valentine is a gift to the heart, a friend to the spirit, a golden thread to the meaning of life.
Happy Valentine’s Day!











Monday 12 February 2018

भेट तुझी माझी

भेट तुझीमाझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्‍नातच स्वप्‍न दिसावे तसे सर्व भास
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची


- मंगेश पाडगावकर

Friday 9 February 2018

काय म्हणावं या बायकांना


नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला –
मी कसा दिसतो ते सांग
बायको म्हणाली —
मेघनादरिपु तात वधी ज्या नराला ।
ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला।
त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी।
तैसे तुम्ही दिसता मजला मनी।
आता बोला.
मला याचा अर्थ काही कळेना म्हणून मी एका विद्वान पंडिताला विचारलं तर त्यानी सांगितलेला अर्थ खाली देत आहे.
मेघनाद म्हणजे इंद्रजित, त्याचा अरि म्हणजे शत्रू कोण ?
तर लक्ष्मण (कारण लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केले होते) अशा लक्ष्मणाचा तात म्हणजे पिता कोण ? तर दशरथ.
दशरथाच्या हातून अजाणता कोण मारल्या गेला ?
तर श्रावणबाळ ( मराठी बारा महिन्यातील क्रमांक पाचवा महिना आहे श्रावण ) श्रावण महिन्याच्या अमावस्येला ( संहिता म्हणजे अमावस्या ) कोणता सण असतो ?
तर पोळा . पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची .( त्या दिवशी बैलाला सजवतात )
त्या सजवलेल्या बैलासारखे तुम्ही दिसत आहात.

आता बोला… काय म्हणावं या बायकांना

Thursday 8 February 2018

गोष्ट त्याची

गोष्ट त्याची...

खर म्हटलं तर जवळच्याच एका मित्राची...सहज बोलून गेला तो आणि मला विचार करायला भाग पाडलं😀
त्याच्या नजरेतून...

एक मुलगी आवडायची पण माझ्यात हिम्मत नव्हती तिला जाऊन विचारण्याची, कारण भीती होती आहे ती मैत्री पण गमवण्याची😅
एके दिवशी जीव मुठीत धरून विचारलं तिला😅 नाही म्हणाली ती...वाटलं आता कदाचित एक नातं सुरु करण्यासाठी असलेलं नातं पण गमावुन बसलो मी😢
मी प्रयत्न सोडले नाहीत... थोड्या दिवसांनी परत विचारलं नकारच दिला तिने. पण या वेळेस मात्र तिच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे वेगळेच दिसले...थोड का होईना प्रेम दिसलं त्या नकारात😄
परत विचारावं वाटलं पण
सतत विचारण बर वाटत नव्हतं म्हणून थोडा थांबलो😀

दिवस सरत गेले...
तिला वाटलं असेल विसरला हा अन् मी पुन्हा एकदा विचारल...कदाचित या वेळेस असं काही केले की तिला रडू आलं अन् मला घट्ट मिठी मारून तिने होकार दिला..

कोणत तरी युद्ध जिंकल्या सारख वाटलं 😄

क्षणाभरात आनंद नाहीसा झाला जेंव्हा तिने एवढे दिवस नकार देण्याचे कारण सांगितले😢

माझ लग्न ठरलवयं घरच्यांनी आधीच😅 आवडतोस मला तु पण आता काही होऊ शकत नाही Sorry 😄
निशब्द उभा होतो 😶

म्हंटल घरी येऊन विचारेल मी तुझ्या. हा बोलले तर चांगल आहे नाहीतर मी समझेल तु कधी भेटलीच नव्हतीस😄

जे मनाला वाटेल ते बोलून टाकाव, वेळ निघुन जायच्या आधी...आणि एवढं बोलून निघुन गेला😄
कदाचित आजही त्याच्या मनात याच गोष्टीची सल असेल की मी माझ मन आधीच मोकळ केलं असतं तर ?😄

मनात आहे ते बोलून टाकावं बिनधास्त😀होकर नकार जे असेल ते स्वीकारता येईल🙌पण आयुष्यभर मनाला समाधान असेल की आपण प्रयत्न तरी केला😊☺️

Sunday 4 February 2018

संकर्षण कऱ्हाडे




कुठून कसं देव जाणे
अनुरूप स्थळ आलं
विदर्भ कन्येचं मराठवाड्याच्या
या पोराशी लगीन झालं

मी बोलका ती अबोल
अशी आमुची एकही
सवय जुळत नाही

कुठून कसं देव जाणे
अनुरूप स्थळ आलं
विदर्भ कन्येचं मराठवाड्याच्या
या पोराशी लगीन झालं

मी बोलका ती अबोल
अशी आमुची एकही
सवय जुळत नाही

छोट्या गोष्टीवरून कोमेजणारी
तिची खुलता कळी खुलत नाही

कोमेजायला कळी तिची
कारणही काही लागत नाही
बिचारी बायको माझ्याकडे
वेळेशिवाय काही मागत नाही

पण एकदा हसली की
हसू तिचं पानावरच दव आहे
आईशपथ हाताला तिच्या
अमृता समान चव आहे

पण खरं सांगतो
तू माझी आहेस
अजून काय हवं

खूप प्रेम आणि आशीर्वाद तुला
अखंड सौभाग्यवती भव


- संकर्षण कऱ्हाडे

हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमा...