Monday 19 February 2018

ब्रेकअप पार्टी अर्थात प्रेमाची पुण्यतिथी ( भाग-२)


 हा माझा झालाय ब्रेकअप. आता मी नात्यातून बाहेर आलोय (जुने कपडे बदलून आल्यासारखे), मेरी भूल थी की मैने तुमसे प्यार किया...एक्सेट्रा एक्सेट्रा.. असा बिनधास्तपणा होता का पूर्वीच्या प्रेमवीरांत? नाही ना मग उगाच कशाला शिकवता आम्हाला... ब्रेकअपमुळे रोना-धोना बकवास आहे.
रिलेशनशीपची व्हॅल्यू नाही असं नाही.. ठेवतो आम्ही व्हॉटसअपला स्टेटस, सॅडटाईपमध्ये डीपी.. येतात मित्राचे चारदोन समजुतीचे फोन. त्यांनाही समधान मिळतं फ्रेंडशीप निभावल्याचं. पहिलाच ब्रेकअप असेल तर, नया है वह.. असे म्हणून काहीजण टॉर्चरही करतात, भडवे.. पण मॉम-डॅड जाम खूश असतात पोरगा सुटला म्हणून. मस्त असतं ब्रेकअप. त्याने साप कात टाकतो तशी पुनर्जन्माची भावना होत असावी..
ब्रेकअप एक-फायदे अनेक...बहुगुणी ब्रेकअप, आयुर्वेदिक ब्रेकअप अशा जाहिरातीही निघतील कदाचित. तो प्रोडक्ट वापरला की ब्रेकअपचा काहीच त्रास होणार नाही, अशा फायद्यावाल्या कॅचलाईन असतील त्यावर.
शेवटी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, असं समाजोपयोगी वाक्य ही ब्रेकअपवाली मंडळी वापरतात म्हणे. त्यामुळे त्यांच्या पदरी मनाचे श्‍लोक म्हणल्याचे पुण्यही आपोअप पडतं. जब दिल ही टूट गया तो जिके क्या करे.. असा बुझदिल विचार थोडाच करायचा असतो.. बी पॉझिटिव्ह..
हां, आहोत आम्ही दुःखात, ओरडून सांगून टाकायचं जगाला सोशल मीडियाच्या कट्‌ट्यावरून (वॉलवर). करायचं दुःख साजरं म्हणजे सेलिब्रेशन म्हणा हवं तर. नाही तरी आपली इंडियन कल्चर करतेच की मरण दिन साजरा. पुण्यतिथी करणं तरी काय असतं वेगळं, दुःखाचं सेलिब्रेशनच ना. मग पार्टी देऊन ब्रेकअप सेलिब्रेट केले तर बिघडलं कुठं. आमच्यासारख्या रंडक्यांच्या (बिनमैत्रिणीच्या) पोटात दुखायचं काय कारण. दुःख साजरं करते ही जनरेशन म्हणजे आपुल्या मरणाचा सोहळा साजरा करते, तुकोबारायांसारखा. केवढा उदात्त विचार. हजार कीर्तन अन सत्संगाचे कार्यक्रम ऐकल्यानंतरही एवढं तत्त्वज्ञान पदरात पडलं नसतं तेवढं एका  ब्रेकअपमुळे येतं. (थॅक्स सोनू, मनू..) याबद्दल तिला शतकोटी धन्यवादच द्यायला हवेत.
दहावा-तेरावा, पुण्यतिथीचं आडवा हात मारून जेऊन येता, तसं मरण दिन प्रेमाचा (ब्रेकअप) सेलिब्रेट केला तर बिघडलं कुठं. शेवटी दुःखात पार्टीसिपेट झालेल्यांचा कडूघास काढावाच लागतो ना. म्हणून द्यावी लागते ब्रेकअपची पार्टी. उद्या कोणी म्हणाले, आताच ब्रेकअप पार्टीत गुलाबजाम खाऊन आलो पोटभर...तर तुमच्या पोटात दुखायचं काय कारण. शेवटी हा उदात्त विचार आहे.
ब्रेकअप झालाय माझा, हे सांगण्यात डबल बेनिफीट असतो. एक तर आपल्यावर कोणीतरी प्रेम केलं होतं हे कळतं, हे सांगताना छाती फुगून येते छपन्न इंचाची (नमोसारखी) ते वेगळंच. आणि असेल तर कुणी पोरगी कतारमध्ये (लायनित) तर ती लगेच अप्रोचही होते. ब्रेकअपमुळे रडतकुडत बसण्यात पॉईंट नाही, असं मानते ही जनरेशन. नाही तरी देवाचे तरी प्रेम कुठे सक्सेस झालेय. कृष्णामुळे राधेचा झालाच ना ब्रेकअप. मिरा राहिलीच ना रडत आयुष्यभर, अनारकली गाडली गेलीच ना भिंतीत सलिमसाठी. आर्ची-परशाचा झालाच ना घात.. इथे आमची राधा सोडून गेलीय तरी आम्ही आहोतच ना जिवंत.. सीर सलामत तो गर्लफ्रेंड पचास.. (शेवटी एकदाच माणूस जन्म मिळतो बरं का, उगाच कशाला सुसाईड-बिसाईड करायचं) केवढा क्रांतिकारी विचार आहे हां. फ्युचरमध्ये पटेल सगळ्यांना...
प्रेम असते लग्नाआधीची चाचणी अन ब्रेकअप असतो घटस्फोटाची रंगीत तालिम... एकाच जोडीदाराला किती काळ कवटाळून बसणार. जुने जाऊ द्या मरणालागुनि.. उगाच नाही म्हणाले मर्ढेकर. जमाना बदललाय, परिवर्तन संसार का नियम है...
रात गयी बात गयी
रिश्ता नया सोच नई
‘प्रेम’से बोलो ब्रेकअपवाले बाबा की जय...


No comments:

Post a Comment

Oh My Captain...!

  रोहित गुरुनाथ शर्मा..! आजचा विषय म्हणजे आपल्या लाडक्या कप्तान साहेबांचा वाढदिवस..!  Happiest Birthday to the Best Captain ❤️ 2013 ICC Cham...