Monday 6 July 2020

हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमान पाच-दहा वेळा तरी हे शब्द कानावर पडतात. घरात बोलण तरी होतच, खरोखरच एका अगदी शुल्लक जीवाणुने संपुर्ण जगाचे व्यवहार ठप्प केले.

३० जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड-१९ ला आंतराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणिबानी म्हणून घोषित केल.



कोविड-१९ च्या अचानक लागलेल्या ब्रेक मुळे अनेकांना खुप समस्यांना सामोर जाव लागल..! सुरुवातीला याच गांभीर्य लोकांना समजल नाही पण जसा जसा आकडा वाढू लागला तस तस लोकांच्या मनातली भीती वाढू लागली.
आधी २१ दिवस नंतर १९ दिवस अस करता करता आज गेले १०० पेक्षा जास्त दिवस लोक घरात आहेत.
या दिवसांत सगळ्याच घरात, मित्रांमध्ये भांडण झाली असावीत, काय करणार कोणाला कोणासोबत राहायची एवढी सवय नव्हती. काहीनी यावर तोडगा म्हणून व्यायाम, योगा किंवा social media ची मदत घेतली. कधी नव्हे ते घरात सगळे एकत्र बसून कधी लक्ष्याचे तर कधी तेलगु सिनेमे बघू लागले, काहींकडे कॅरम, पत्ते सुरु झाले..!
एक गोष्ट मी खात्रीनिशी सांगू शकतो लॉकडाउन नंतर जवळपास प्रत्येकाला पत्ते खेळता येत असतील 😂

या चांगल्या गोष्टी होत्या पण खरा त्रास त्यांना झाला जे दुसऱ्या राज्यातुन महाराष्ट्र राज्यात कामासाठी आले होते पण ते पाय कोरोना मुळे थांबले नाहीत, ज्या दिवशी त्यांनी पायी प्रवास सुरु केला तेंव्हा त्यांची कळकळ लोकांना कळाली असावी..!

या संकटकाळात आपले पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार सगळ्यांनी मानले, काय तरी होत हा #DilSeThankYou नुसत Social Media वर काही टाकून काही होत नाही,
जे हिंदी आणि मराठी अभिनेते ज्यांना तुम्ही Follow करता त्यांनी त्या Post शिवाय काय केल का ? याचा विचार एकदा नक्की करा..!

हे ही दिवस एक दिवस नक्की जातील,

१५ ऑगस्ट पर्यंत कोविड-१९ वर लस मिळेल अस आज ज्ञानदा कदम कडून ऐकल, बाकी ती खुप प्रसिद्ध झाली..!

थोडा अवकाश अजुन थोडा धीर ही वेळ देखील जाईल परत सगळे आपल्या कामाला लागतील ..!

Be Positive कोरोना ने नाही मनाने 🙌

1 comment:

हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमा...