Friday 30 March 2018

"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"

लग्नाला बारा वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...
"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"


तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ...
पण मग लग्न झालं ...
संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ...
त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती ..
हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे ..
संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'
असं म्हणून तो कामावर सटकला ... !
तो घरातून बाहेर पडला खरा ...
पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं ..
तो विचार करत होता ..
काय सांगावं .. ?
मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ...
नको .. फार फिल्मी वाटतं ..
तू खूप छान आहेस ...
असं म्हणावं ... नको ...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे ..
समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ...
राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...
बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ...
त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..
सूर्य मावळला ...
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...
याची त्याला खात्री होती ...
घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ...
मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ... "भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ..."
तो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...
बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ...
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ...
तिनं तोंडभर हसून विचारलं .. "काही सुचलं ... ? "
त्यानं नकारार्थी मान हलवली ...
तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... "मलाही नाही सुचलं ... ! "
तो पुन्हा गोंधळला ...
इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... ?
आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? "
सात दिवस विचार केला ..
पण मला काही सांगताच येईना ...
मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ...
मला स्वतःविषयी शंका होती पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ...
वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ...
म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ...
आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... "
असं म्हणून तिनं एक कांदा भजी त्याला भरवली ...

त्याच्या बारा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता !!!

Tuesday 27 March 2018

जगणेच महाग..

गहू महाग, तांदूळ महाग ..चहा पिण्या साखर महाग..

तेल महाग तूप महाग ..आंघोळीचा साबण महाग..

पाणी महाग दूध महाग शेतीसाठी बियाणे महाग..
बैल महाग गाडी महाग पंपासाठी वीज महाग..
तक्रार सांगाया जावे तर ऐकणारे अधिकारी महाग..

मंत्र्यांची सदा ती  परदेशवारी तरीही एसटीचे तिकीट महाग..घरी शांत बसू म्हटले तर राहण्यासाठी घरे महाग..


कार महाग रिक्षा महाग सावलीसाठी झाडे महाग..
जगण्याचाच येतो वीट परंतु जाळून घेण्या रॉकेल महाग..

Friday 23 March 2018

आजच्या मुली Sry Girls



मी या आधी पण म्हंटलय, जेंव्हा पर्यंत बदल दिसत नाही तेंव्हा पर्यंत बोलणार, आज ची Generation बाद झालेली आहे..
No Doubt यार, कदाचित त्यांना मोठ व्हायची जरा जास्त च घाई आहे किंवा develop होण्याची..
अरे भारत 2020 ला महासत्ता होणार अन् Fashion मध्ये नाही फक्त selfie काढून झाल असेल तर द्या लक्ष इकडे पण

माझ बोलण काहीना bor वाटत असेल.. ज्यांना कळेल ते लोकांना माझा आताच हात जोडून दंडवत आभार..

तर विषय आज मुलींबद्दल,



मला सगळ्यात जास्त या गोष्टीच वाईट वाटत, मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावला खर पण ज्या गोष्टी मुलांनी देखील बंद केल्या पाहिजेत ते सगळ मुली देखील करायला लागल्यात अरे काय हे..?

शिव्या देण, भांडण करन, फसवण कोणाला काय चालय यार ?
तुम्ही काय आदर्श Dirty Picture च्या vidya balan चा घेताय का ?

आऊसाहेबांचा आदर्श घ्या ना यार गरज आहे 🙏

सगळ्यांना काय मी वाईट बोलत नाही पण जे आपण करन थांबवल् पाहिजे ते आपणच करतोय याला अर्थ नाही 😅

सगळे

आपली संस्कृति विसरत जातेय पिढी, मला तर Dress घातलेली मुलगी पाहीलेली बरेच वर्ष लोटलेत अस वाटत 😂 एवढ पण बदलू नका की ओळखले पण जाणार नाही कधी परत 🙏

सगळे काही वाईट नसतात कधी च पण काहीं मुळे सगळे बदनाम होतात यात काय विशेष नाही.

Tuesday 20 March 2018

जाणून घेण्यासारखी मुंबई..

तुम्हाला मुंबईकर व्हायचय का ?

पु ल चा लेख वाचला काल म्हंटल विषय भेटला.. copy नाही करणार त्यांना प्रयत्न छोटासा त्यांनी लिहलेली मुंबई आणि आजची मुंबई यातला फरक किंवा आताची बदललेली मुंबई..

तर,

सुरुवात करूया मुंबई ओळखली जाती तो वडापाव 😍 कदाचित त्याची taste गेली कित्येक वर्ष नसेल बदलली..
पण मानल् पाहिजे मुंबईला,
परीक्षा घेते, वाईट दिवस दाखवते, पण सुख काय असत ते marine drive ला बसून दाखवते सुद्धा..❤

मध्ये पावसामुळे खुप हाल झाले मुंबईकरांचे पण म्हणतात ना,

आज डुबेगी, भिगेगी, जलेगी, टूटेगी ...
जनाब ये मुंबई है,
कल उसही शानसे फिरसे खड़ी रहेगी ! !

मुंबई बद्दल कोणी काही वाईट बोलल तर कोण काही उलट बोलत नाही कदाचित अभिमान आहे हे दाखवण्याची गरज आम्हाला नसावी 😂😂



 तुम्हाला बोला ते बोलायचय इथे प्रत्येकाच स्वप्न असत मुंबई मध्ये एक स्वतःच घर असाव 😄

बाकी, मुंबई आणि राजकारण याच वेगळच् नात आहे..

साहेबांच्या वेळेस जी मुंबई भरलेली ते आज पण ते डोळ्यासमोर आल की मुंबई च साहेबांवर किती प्रेम असाव याचा अंदाज देखील बांधता येत नाही 🙌🏻

गणपती म्हणजे काय ? पाडवा कशाला म्हणतात ? दिवाळी पहाट कशी होते ?
हे सगळ जाणून घ्यायच असेल तर मुंबईला येऊन बघा अस म्हणतात..
ढोल ताशा उत्तम उदाहरण..
तस सगळीकडे आहेत पथक पण 450 हुन अधिक ढोल पथक आहेत मुंबई मध्ये 😍

तो आवाज तो जोश कदाचित दुसरीकडे भेटन अवघड वाटत 😄

मुंबई खर तर जपली जाते आमच्या इथे आजची Generation हिंदी आणि English  बोलता येत असेल त्याला stud समझते 😂 मराठी बोलण म्हणजे गुन्हा झालाय 😂 म्हणून आम्ही मागे आहोत पण एक खर आहे,

कोणाला force नाही करत आम्ही मराठी बोलच्, पण कोणामुळे आम्ही मराठी बोलन सोडत देखील नाही 🤘🏻

मुंबई म्हणजे काय सांगणार,
ज्याला भुक लागली की वडा पाव चालतो तो मुंबईकर 😍

ज्याच्या अंगावर वादन चालू  असताना काटा येतो तो मुंबईकर 😘

छत्रपती शिवाजी महाराज की म्हंटल्यावर जो आपोआप जय म्हणतो तो मुंबईकर 😍

शेवटी एकच सांगतो,

मुंबई एक शहर नाहिये

ते एक Emotion आहे ❤

Sunday 18 March 2018

एक होती ती अन् एक तो..( भाग -२ )

मागील भागावरून पुढे चालू 
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...
"सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे.
आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे.
खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.





तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं.
किती हळुवार होतं त्याचं मन.
मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!


मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच  आपला जीवनसाथी.
तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.
मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं!
चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले.
एखाद्या परीकथेसारखे.

खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं.
ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा!
आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या  कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही.
एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...

काही दिवसांनी ती सावरली.
रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.
एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.
त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.

"माझ्या प्रिये, मला माफ कर!

आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही...
केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती!

त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे.
आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती!
पण मला तु खुप आवडतेस...
आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो...

...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे  नाही तर हे खोटेपणाचं  ओझं मी पेलू शकणार नाही!

प्लीज - मला माफ करशील?"

Thursday 15 March 2018

एक होती ती अन् एक तो..( भाग-१ )


(मूळ लेखक: अज्ञात)




त्याला ती एका पार्टीत भेटली.
खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.
ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.


तो फार साधा, आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा.
त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच!
तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!


पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं,
"तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?"


तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं.
ती "हो" म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं.
या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!

जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली.
कॉफीची ऑर्डर दिली.
पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता.
आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली.
झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!

कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला.
त्यानं वेटरला हाक मारली.
वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला.
तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!'

सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं.
विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले.
तीसुध्दा!

वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला.
त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला!
ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क  मीठ!

अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"

Monday 12 March 2018

तिचा last Seen...



आजकालच जग जास्त करून आधी last Seen चेक करतात नंतर Call करतात.. दुनिया जरा जास्त च social झाली आहे असो
पण त्याच तस नव्हतं त्या दिवशीच रात्री त्यांची भांडण झाली तो mobile च net बंद करून झोपला तिचे msg आले पण तो झोपलेला सकाळी पाहील त्याने Gud mrng बोलला विसरलेला तो सगळ एक गोडस् कारण होत

Theme ला असलेला तिचा photo 😄
भरपूर वेळ वाट पाहिली त्याने आता येईल नंतर येईल Online



10 - 10 मिनिटाने तो तिचा last seen पाहत होता सकाळ ची दुपार झाली दुपारची संध्याकाळ 😅
त्याला आता भिती वाटत होती म्हणून त्याने कॉल केला तिने उचलला 2 3 वेळा ति Hello बोलली अन् त्याने phone ठेवला 😄

सगळ नीट असल्याची खात्री झाली त्याला मनात त्याच्या आता एकच प्रश्न होता सगळ नीट आहे हे बर झाल पण तरी online का आली नसावी 🤔

विचार करत करत तो हे सगळ लिहायला लागला अजुन पण वाट बघतोय तो rply ची नव्हे तिचा last seen बदलण्याची...



Sunday 11 March 2018

काश कोई लडकी मुझे प्यार करती 😛



Single लोकांची One sided Love स्टोरी ✌️

बाकीच्यांसाठी नेहमीप्रमाणे गंमतीचा भाग 😂



तर हे फक्त त्यांच्यासाठी आहे,
जे लोक प्यार तो बहोतो से करते है ,मगर इकरार कभी न कर पाये, किया तो भी नसीब मैं ना आये 😂✌️

I Respect those who tried for their love पण असं एकदा म्हंटल बाहेर तर एकाने छान उत्तर दिल,
" हमारा Crush वहा पैदा होता है, जहा कोई सवाल ही पैदा नही होता 😂😂 "

काय म्हणाव यावर आता 😂



Crush Disha Patni असेल एखाद्याची तर खरचं काही करून काही होत नसतं 😂 priya Varrier असेल कोणाची crush तर प्रयत्न सोडून भुवया उडवायला शिका फकस्त 😝

एकदा एका मित्राने मस्त plan केला तिला purpose करायला, तो गेला एक शायरी बोलला तिच्यासमोर

" ना भगवान करे जाहिर
   ना ऐलान खुदा करता है,
   वो दिल होता है
   जो दिल की बाते बया करता है "

आवडल तिला 10 - 15 मिनिट बोलत होते दोघजण,मला वाटल जमतय आता 😂मनात म्हंटल बर झाल,
नंतर,
Coffee साठी विचारलं त्याने तिला

काय संपल ना 😂

Chai Lovers ना शेवटी ❤️

असो,

प्रत्येकाला वाटत आपली Gf असावी, तिच्यासोबत फिराव bt नाही होत हे सगळं शक्य,
त्यांनी काय कराव हे मी नाही सांगू शकत😞

एवढं लक्षात ठेवा मित्रांनो,

आपल वागणं चांगल ठेवा, मन साफ ठेवा, विचार creative करा आपोआप सगळ नीट होईल ✌️

आणि main म्हणजे

Keep Filrting 😂✌🏻

तिला नाही कळाल पाहिजे
आपण दूसरी सोबत Filrt करतो आणि दूसरीला तिसरी च 😂😂

You will be Successful one day 😂✌




Wednesday 7 March 2018

स्त्री शक्तीला सलाम..

महिला दिनानिम्मित्त


।। सुर की ताल है तु
   जीवन का प्राण है तु।।
।।जिंदगी का अभिमान भी तू
   हर वृक्ष की नीव भी तू ।।




सुचत नव्हतं काही म्हणून Whtsapp la Broadcast बनवल त्यांना एक प्रश्न विचारला,
स्त्री म्हणजे तुमच्या साठी काय ?
उत्तर ऐकन्याजोगी होती..
काहीना स्त्री आई च रूप वाटत, काहीना जबाबदारी, आधारस्तंभ
काहीनी खुप छान उत्तर दिली

• "स्त्री म्हणजे multitasking. Who can handle every situation, who can face any problem. Women means POWER. Women means sacrifice. Women means LOVE. Last but not least Women means RESPECT ❤ "


• त्या परमेश्वराने संपूर्ण विश्व रंगवून झाल्यावर, शेवटी स्वच्छंदी मनाने व आपल्या सर्वात आवडत्या कुंचल्याने रंगवलेली पूर्णाकृती...


अशी सुंदर, सर्वश्रेष्ठ कलाकृती निर्माण केल्यावर ब्रम्हदेव ही गोंधळात पडले असतील, कदाचित त्यामुळे देवांना स्त्रीच्या मनाचा ठावठिकाणा घेता आला नाही, त्यापुढे आपल्या पामरांची गोष्टच निराळी...


• स्त्री म्हणजे माझ्या साठी सगळ्या चा आयुष्यातलं एक सुदंर combination जे नेहमी सगळ्या साठी तुमच्या सोबत असते तुम्हाला support करते....in short the best thing of life..


• जीवनात अडचणी आल्यावर पुरुषाच्यामागे ठामपणे उभी राहते ती स्त्री 🙏🙏🙏


• एक अशी माऊली की जी सर्व रूपांत समोरच्याची स्वतःहून जास्त काळजी घेते..
माझ मत मला कदाचित माहित नाही मलाच पण मुलांना सांगू इच्छितो की,
तुम्हाला तुमच लग्न होत पर्यंत Girlfriend बदलाव्या  वाटतात पण लग्नासाठी Bf नसलेली पाहिजे असते
कस शक्य आहे लेका 😄

माझ्या असण्यावर " ती " नाही
पण माझ्या नसण्यावर " मी " ही नाही..
'ती' च्या शिवाय जन्म नाही..
'ती' च्या माणसच अस्तित्व नाही ✌🏻



एक छान कविता वाचली काल


" ती मला म्हणते की एकदा मी होऊन बघ,
तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्याची गमंत काय असते,
एकाच जन्मी बाई असण्याची कििंमत काय चांगल्या dish करून देईल मी,
कोथींबिर चिरलेलीच घेते,
तेंव्हा नंतर घासायची एक dish कमी होते,
तुमचे पाहुने आले की Office ला सुट्टी टाकते,
Office ची कामे तरीही सांभाळत तारेवरची कसरत करते,
सगळे झोपल्या नंतर कळते थोडे दुकतायेत पाय,
तेंव्हा कळेल दुसऱ्यासाठी जगण्याची गंमत काय..
घरची सीमा असून देखील मी सीमेवरती लढते,
अंगनात रमनारी मी, अवकाशाला भीडते 😘✌🏻
मित्रांनो,
निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहुद्या,
बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा मिळू द्या 😄
सोबत असता सोबत माझ्या ,
तु मि सोबती होऊ
❤ 👈🏻 इकडून थोडा विचार कर म ,
कळेल तुला ही अन् त्याला ही स्त्री असण्याची किमंत काय " ✌🏻

Tuesday 6 March 2018

पुण्यातल् लग्न



पुण्यात प्रथमच कोणत तरी लग्न Attend करण्यासाठी गेलतो अर्थात घरचयानि नेलेल 😂
असो,
3 तास पुण्यात जायला लागतात अस ऐकुन होतो पण काय म्हणाव आता जाउद्या 😂🙌

तर सुरवात पोहचलो 11 ला हॉल वर मस्त भरलेला होता छान वाटल बघून.. Mike वर कोणतरी भरपूर वेळ बोलत होत..
ऐकत नव्हतं कोण त्यांच तस मी आपला ऐकत होतो त्याच भरपूर वेळ..उद्धटपणा काय असत कळाल त्या दिवशी 😂😂

पुण्यात गेलोय हे कदाचित त्यामुळे च कळले..

पुढे जेवण सुरु होणार आहे हे सांगितले त्यांनी 3 4 लोक उठली चुकल खर तर त्यांच ते विसरलेले पुण्यात आहेत ते 😂
5 मिनिटामध्ये तोच माणूस परत बोलला दरवाजा बंद करून ठेवा चालले लगेच सगळे टिळा तर होउद्या 😂 मनात म्हंटल मी आधी कशाला बोलायच म् 😂

बर ते झाल गेलो जेवायला पाहील तर Shutter बंद होत बाहेर सगळे उभे होते तेंव्हा कळाल जे आत आहेत त्यांच झाल्याशिवाय बाकीचे बाहेरच उन्हातच निदान सावलीसाठी काही तरी लावाव तरी

थोड्या वेळाने आला नंबर आमचा आत गेलो बसलो ती बाई वैतागलेली वाटत कारण कधी कोणाला एवढ्या रागात कोणाला पानी देताना पाहील नव्हतं मी 😂

जेवण झाल म्हंटल बाहेर जाऊया उठलो निघालो तर बाहेर जायला पण Line 😂 तो प्रकार काही अजुन समझला नाही मला 😝 कोणी असेल पुण्याच तर नक्की सांगा बर का मला 😆

एक शब्द ऐकला 2 दिवस झाले तोंडात आहे तो " खवाट " पण तो माणूस जसा बोलला तस काय जमत नाय बाबा

'पोरग लय खवाट हाय ते 😂😂🙌 '

जायच्या आधी कोणीतरी सांगितलेल पोरी छान असतात पुण्यात कसल काय 😝 कदाचित सगळ्या मुली मुंबई मध्ये Shift झाल्या असाव्या 😂

जाऊद्या



लग्न छान झाल मात्र ✌️

शेवटी नवरी मात्र आपली आसव थांबवु नाही शकली..

असच असत लग्न कोणाच् ही असुद्या सुरुवात आनंदाने होते शेवट आसवांनी 🙌

असो पहिल लग्न पाहील पुढे परत कधी जाईल वाटत नाही 😂

Sunday 4 March 2018

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही...



हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही
ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही
जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही
आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही
कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही
मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…


- सुरेश भट

Thursday 1 March 2018

निर्भय एकटा तो..!



एक बाकी एकाकी, एक अंत एकांत, एक अडके एकात, एक एकटया जगात, एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा, एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच..






आयुष्यात माणूस एकटा येतो एकटाच जातो.. काही शंका नाही यात पण आपल्या कडे family, मित्र परिवार असतात.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ऐकलेल, अनाथ मुल जे कदाचित त्यांना काही कळत नाही तेंव्हा पासून तिथे च असतात ( अनाथ आश्रमामध्ये ) चांगली गोष्ट आहे ज्याचं कोणी नाही त्यांना मदत करतात आश्रम पण एक नियम आहे त्यांचा मुल १८ वर्षाची झाली की त्यांना आश्रम सोडुन जाव लागत 😅
कदाचित अश्या जगात तिथे ते कधी वावरले नाही ना त्यांच कोणी नातेवाईक नसलेल्या इथे घर असलेल्या आई वडील भाऊ असलेल्या आपल्या बहिनीवर अत्याचार होतो तर मित्रांनो विचार करून पहा त्या अनाथ मुलीवर किती अन्याय होत असेल हे समोर येत नसाव कारण त्यांची Missing Complaint करणार कोण नसत 😔
दूसरी गोष्ट म्हणजे बाहेर पडल्यावर त्यांच्या कडे काही आधार कार्ड, Pan Card नसत की कुठे job भेटावा 😶
कुठे तरी job करून आपला निर्वाह करत असतात, सरकारने या बाबतीत लक्ष घातल पाहिजे नक्कीच 🙏
हे सगळ त्या दिवशी निशब्द झालो भरपूर दिवसानी हे सगळ्यांसमोर याव म्हणून लिहल 🙏

नक्की पुढे share करा भरपूर लोकानां कळूद्या हीच विनंती 🙏


हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमा...