Thursday 15 March 2018

एक होती ती अन् एक तो..( भाग-१ )


(मूळ लेखक: अज्ञात)




त्याला ती एका पार्टीत भेटली.
खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.
ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.


तो फार साधा, आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा.
त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच!
तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!


पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं,
"तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?"


तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं.
ती "हो" म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं.
या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!

जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली.
कॉफीची ऑर्डर दिली.
पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता.
आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली.
झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!

कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला.
त्यानं वेटरला हाक मारली.
वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला.
तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!'

सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं.
विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले.
तीसुध्दा!

वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला.
त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला!
ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क  मीठ!

अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"

No comments:

Post a Comment

Oh My Captain...!

  रोहित गुरुनाथ शर्मा..! आजचा विषय म्हणजे आपल्या लाडक्या कप्तान साहेबांचा वाढदिवस..!  Happiest Birthday to the Best Captain ❤️ 2013 ICC Cham...