Saturday 11 April 2020

It's Not that Simple..! (Part 2)


आता कॉलेज संपल सगळे Job वर जाऊ लागले कोणी तर कोणी पुढे शिक्षण सुरु ठेवले,
नेहा आणि प्रियांश ने Engagement करून घेतली आणि ते त्यांच्या happy life मध्ये खुश होते,
विजय आणि ओवी च देखील छान चालेलल अस Social Media वर तरी दिसत होत,

आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलीने वयाची २५ शी ओलांडली की तिच्या लग्नाचा विचार केला जातोच, खर तर हे चुकीच आहे but त्या मुद्यावर बोलण चुकीच ठरेल आता,
ओवी साठी २ ३ स्थळ आली पण तिने त्यांना नकार देत शेवटी घरी सांगितले की माझ एका मुलावर प्रेम आहे,
तिचे घरचे काही Hitler Type चे नव्हते त्यांनी विजय ला घरी बोलव म्हणून सांगितले,
ओवी आता खुश होती की विजय घरी येऊन भेटला की सगळ नीट होईल पण विजय ने त्याच्या घरच्या Pressure मुळे माघार घेतली अन् ओवी पूर्णपणे तुटली.
तिने घरी सांगितले की मला लग्न नव्हतं करायच म्हणून मी तस कारण सांगितलं,अन् नंतर आलेल्या स्थळ त्याला ति हा बोलली,आणि तीच अभिजीत सोबत लग्न पार पडलं.

दूसरी कडे प्रतिकेश अजुन ही Life Set करण्यात व्यस्त होता,नेहा प्रियांश च लग्न होऊन आता ७ महीने झालेले,
बाकी मित्र राम, प्रियंका आप आपली Life Set करत होते,

एक वर्ष भराने College Reunion मध्ये सगळे एकत्र आले,
शेवटी प्रतिकेश ने त्याच मन मित्रांजवळ मोकळ केल सगळ्यांना खुप वाईट वाटल ऐकुन तेंव्हा मागे उभी राहून  ओवी सगळ ऐकत होती,
तिला ते सगळ ऐकुन खुप वाईट वाटल पण आता ति या बाबतीत काहीच करु शकत नव्हती.

Reunion संपता संपता ओवी ने प्रतिकेश ला बोलवुन तिला घरी सोड अस म्हंटल, तो नाही बोलू शकला नाही.
घरी जाता जाता ओवीने त्याला विचारल,
प्रतिकेश झाल ते ऐकल मी, खरच Sorry मला नाही कळाल तुझ्या मनात नक्की काय होत,
But आता तरी move on कर.

प्रतिकेश या तिच्या प्रश्नासाठी तयार नव्हता, त्याने मान डोलावली, तिला घरी सोडुन तो निनाद जवळ गेला अन् त्यांच्या नेहमी च्या कट्टयावर जाऊन दोघ बोलत बसले,

३ महीने उलटले,
अन् ओवीच्या आयुष्यातील सर्वात कठीन वेळ तिच्या समोर येऊन ठेपली, तिचा नवरा अभिजीत त्याच Car Accident मध्ये निधन झालं,ओवीच आयुष्य म्हणजे दुःखा शिवाय दुसर काही नव्हतं अस तिला वाटायला लागल,
तीच वय फक्त २७ एवढं होत पूर्ण आयुष्य इथुन पुढे ति एकटी काढु शकेल अस तिच्या सासरच्या लोकांना वाटत नव्हतं,

त्यांनी ओवी शी संवाद साधला तिच्या घरच्याना सुद्धा सोबत घेऊन तीच परत लग्न लावुन द्यायच ठरवल् पण ही कठोर दुनिया तिला Accept करत नव्हती खुप स्थळ बघुन झाली बऱ्याच जागी नाव नोंदवुन देखील झाल परंतु तिला कोणी नांदवुन घेण्यास तयार नव्हतं,

काही common मित्रांद्वारे प्रतिकेश ला हे सगळ समझले त्याने गेल्या कित्येक वर्षात घरच्याना मला लग्न नाही करायच असा हट्ट धरून ठेवलेला, त्याने आज घरी स्वतःओवी बद्दल त्याची कॉलेज ची प्रेम कहानी सांगितली,

आई म्हणाली चल आता जाऊ तिच्या घरी लगेच घरात आनंदाच वातावरण तयार झाल,
पण प्रतिकेश तिथेच बसुन होता, तो आई जी आत kitchen मध्ये काही तरी गोड आणायला गेलती तिला परत बोलवत बोलला,
आई अजुन माझ पूर्ण सांगून झालेल नाहीये,
त्याने पूर्ण गोष्ट सांगितली,
थोडा वेळ घरात पूर्ण शांतता होती अन् आई उठली व निघुन गेली,
प्रतिकेश देखील उठून त्याच्या रूम मध्ये गेला, त्याची ताई त्याच्या मागे आली अन् त्याच्याशी बोलू लागली,
तेवढ्यात आई त्याच्या आवडीचे कंदीपेढे घेऊन तोंड गोड करायला आली,

प्रतिकेश च्या समोर आता फक्त ओवीच्या घरच्यांकडून होकार मिळवण बाकी होत,त्याने आधी ओवीला भेटून तीच मत जाणून घ्यायचा ठरवल,
ते दोघ भेटले त्या दिवशी तिने तीच मोकळ केल,
ति कॉलेज मध्ये पण त्याची वाट बघत होती पण तिला वाटल त्याच्या मनात नव्हतं अस काही म्हणून ति गप्प होती,
दोघ २ मिनट शांत बसुन एकमेकांकडे बघुन हसु लागले,
कदाचित त्यांच्या नशिबात एकत्र येन होतच.

ओवीने तिच्या घरी सर्व काही सांगितले, तिच्या घरच्यानी होकार दिला,
आज प्रतिकेश आणि ओवी दोघ एकत्र आहेत कदाचित जे काही झाल त्यामुळे आज ते एकत्र होते..!
खरच,
It's Not That Simple..!

2 comments:

हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमा...