Saturday 11 April 2020

It's Not that Simple..! (Part 2)


आता कॉलेज संपल सगळे Job वर जाऊ लागले कोणी तर कोणी पुढे शिक्षण सुरु ठेवले,
नेहा आणि प्रियांश ने Engagement करून घेतली आणि ते त्यांच्या happy life मध्ये खुश होते,
विजय आणि ओवी च देखील छान चालेलल अस Social Media वर तरी दिसत होत,

आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलीने वयाची २५ शी ओलांडली की तिच्या लग्नाचा विचार केला जातोच, खर तर हे चुकीच आहे but त्या मुद्यावर बोलण चुकीच ठरेल आता,
ओवी साठी २ ३ स्थळ आली पण तिने त्यांना नकार देत शेवटी घरी सांगितले की माझ एका मुलावर प्रेम आहे,
तिचे घरचे काही Hitler Type चे नव्हते त्यांनी विजय ला घरी बोलव म्हणून सांगितले,
ओवी आता खुश होती की विजय घरी येऊन भेटला की सगळ नीट होईल पण विजय ने त्याच्या घरच्या Pressure मुळे माघार घेतली अन् ओवी पूर्णपणे तुटली.
तिने घरी सांगितले की मला लग्न नव्हतं करायच म्हणून मी तस कारण सांगितलं,अन् नंतर आलेल्या स्थळ त्याला ति हा बोलली,आणि तीच अभिजीत सोबत लग्न पार पडलं.

दूसरी कडे प्रतिकेश अजुन ही Life Set करण्यात व्यस्त होता,नेहा प्रियांश च लग्न होऊन आता ७ महीने झालेले,
बाकी मित्र राम, प्रियंका आप आपली Life Set करत होते,

एक वर्ष भराने College Reunion मध्ये सगळे एकत्र आले,
शेवटी प्रतिकेश ने त्याच मन मित्रांजवळ मोकळ केल सगळ्यांना खुप वाईट वाटल ऐकुन तेंव्हा मागे उभी राहून  ओवी सगळ ऐकत होती,
तिला ते सगळ ऐकुन खुप वाईट वाटल पण आता ति या बाबतीत काहीच करु शकत नव्हती.

Reunion संपता संपता ओवी ने प्रतिकेश ला बोलवुन तिला घरी सोड अस म्हंटल, तो नाही बोलू शकला नाही.
घरी जाता जाता ओवीने त्याला विचारल,
प्रतिकेश झाल ते ऐकल मी, खरच Sorry मला नाही कळाल तुझ्या मनात नक्की काय होत,
But आता तरी move on कर.

प्रतिकेश या तिच्या प्रश्नासाठी तयार नव्हता, त्याने मान डोलावली, तिला घरी सोडुन तो निनाद जवळ गेला अन् त्यांच्या नेहमी च्या कट्टयावर जाऊन दोघ बोलत बसले,

३ महीने उलटले,
अन् ओवीच्या आयुष्यातील सर्वात कठीन वेळ तिच्या समोर येऊन ठेपली, तिचा नवरा अभिजीत त्याच Car Accident मध्ये निधन झालं,ओवीच आयुष्य म्हणजे दुःखा शिवाय दुसर काही नव्हतं अस तिला वाटायला लागल,
तीच वय फक्त २७ एवढं होत पूर्ण आयुष्य इथुन पुढे ति एकटी काढु शकेल अस तिच्या सासरच्या लोकांना वाटत नव्हतं,

त्यांनी ओवी शी संवाद साधला तिच्या घरच्याना सुद्धा सोबत घेऊन तीच परत लग्न लावुन द्यायच ठरवल् पण ही कठोर दुनिया तिला Accept करत नव्हती खुप स्थळ बघुन झाली बऱ्याच जागी नाव नोंदवुन देखील झाल परंतु तिला कोणी नांदवुन घेण्यास तयार नव्हतं,

काही common मित्रांद्वारे प्रतिकेश ला हे सगळ समझले त्याने गेल्या कित्येक वर्षात घरच्याना मला लग्न नाही करायच असा हट्ट धरून ठेवलेला, त्याने आज घरी स्वतःओवी बद्दल त्याची कॉलेज ची प्रेम कहानी सांगितली,

आई म्हणाली चल आता जाऊ तिच्या घरी लगेच घरात आनंदाच वातावरण तयार झाल,
पण प्रतिकेश तिथेच बसुन होता, तो आई जी आत kitchen मध्ये काही तरी गोड आणायला गेलती तिला परत बोलवत बोलला,
आई अजुन माझ पूर्ण सांगून झालेल नाहीये,
त्याने पूर्ण गोष्ट सांगितली,
थोडा वेळ घरात पूर्ण शांतता होती अन् आई उठली व निघुन गेली,
प्रतिकेश देखील उठून त्याच्या रूम मध्ये गेला, त्याची ताई त्याच्या मागे आली अन् त्याच्याशी बोलू लागली,
तेवढ्यात आई त्याच्या आवडीचे कंदीपेढे घेऊन तोंड गोड करायला आली,

प्रतिकेश च्या समोर आता फक्त ओवीच्या घरच्यांकडून होकार मिळवण बाकी होत,त्याने आधी ओवीला भेटून तीच मत जाणून घ्यायचा ठरवल,
ते दोघ भेटले त्या दिवशी तिने तीच मोकळ केल,
ति कॉलेज मध्ये पण त्याची वाट बघत होती पण तिला वाटल त्याच्या मनात नव्हतं अस काही म्हणून ति गप्प होती,
दोघ २ मिनट शांत बसुन एकमेकांकडे बघुन हसु लागले,
कदाचित त्यांच्या नशिबात एकत्र येन होतच.

ओवीने तिच्या घरी सर्व काही सांगितले, तिच्या घरच्यानी होकार दिला,
आज प्रतिकेश आणि ओवी दोघ एकत्र आहेत कदाचित जे काही झाल त्यामुळे आज ते एकत्र होते..!
खरच,
It's Not That Simple..!

Wednesday 8 April 2020

It's Not that simple..! (Part 1)


खुप दिवसापासून हा विषय डोक्यात चालू होता पण काही गोष्टी स्पष्ट होत नव्हत्या, आज पूर्ण विषय समझला आणि लिहायला घेतलचं❤️

मुल खरच प्रेम करतात का? हा अगदी सरळ, साधा पण खूप गंभीर असा प्रश्न आहे परंतु माझा असा प्रश्न आहे की मुली एखाद्याला होकार देण्याआधी विचार करतात का?

या कथेमध्ये एक कॉलेज मधील एक मित्र परिवार आहे. त्यात तीन मुली नेहा, ओवी आणि One of the common name प्रियंका, तसेच चार मुलं विजय, प्रियांश, राम आणि प्रतिकेश असे आहेत.

या group मध्ये एक couple होत - प्रियांश आणि नेहा, दोघांचीही फार जुनी ओळख अगदी शाळेपासुन छान चाललेल त्यांच.

कॉलेज मध्ये सगळेचं मित्र खरंतर खुप close असतात त्याला कारण एकचं ते म्हणजे रोज रोज भेटणं आणि मस्ती करणं, सहसा भांडण होत नाही. एकदा Bonding नीट असेल तर रोजचं यांच routine fix असतं. एक एक भन्नाट character असलेले सगळे एकत्र आले की एक छान मैत्री पाहायला मिळते आणि यांच सुद्धा काहीस असंच होत.

प्रत्येक ग्रुप मध्ये एकतरी रागीट मित्र असतोच अगदी तसंच राम ला सगळ्यात जास्त राग येतो अस सगळे बोलायचे पण खरतर ओवी चा राग म्हणजे खतरनाक होता आणि तिला विजय चिडवुन हैराण करायचा, त्याच असं म्हणण होत की,
'भाई मस्ती तर पाहीजेचं त्याशिवाय ते कॉलेज लाईफ कसलं' 
भन्नाट होता खरतर तो.

प्रियंका तिच्या नावाप्रमाणे not so interested type ची होती तुम्हाला हवं ते करा असं एकदम तिला कोणाचं काही पडलेलं नसायचं.

राहीलेला प्रतिकेश आशिक होता पण कोणाला माहित नसलेला, बोलायच म्हंटल तर एकदम छुपा रुस्तम आणि हो त्याच ओवी वर प्रेम सुद्धा होत बरं का पण फक्त त्याला आणि Building मधला त्याचा मित्र निनाद याला माहित होत. त्याला नेहमी वाटायच की आपली मैत्री खराब होईल एका निर्णया मुळे म्हणून तो गप्प होता.
त्याला आता खरच आपल्या प्रेमाबद्दल ओवीला सांगाव वाटल पण Friendship Day दिवशी ओवी ने त्याला खास मित्र म्हणून एक मोठा msg पाठवला आणि ते ऐकुन त्याला वाटल तिच्या मनात आपल्याबद्दल नसावं काही,

प्रतिकेशच्या घालमेल वर बोलायच झालं तर गुलजार यांच एक काव्य आठवत,

कदर कर, जता मत
फिक्र कर, दिखा मत
तु चाहता है की दोस्ती रहे
तो मोहब्बत कर, बता मत 🤙

त्याला मैत्री गमवायची नव्हतीच म्हणून तो गप्प बसला. पण त्याला काय माहित होत की उद्या त्याचाच मित्र विजय तिला Propose करेल आणि ओवी त्या दिवशी त्याला नाही बोलली आणि प्रतिकेश ने सुटकेचा श्वास घेतला.

काही दिवस त्यांचा तो Happy Group थोडा बिखरलेला वाटलाआणि ओवीला तिच्या Decision मुळे हे सगळं झालंय असं सारख वाटत होतं. तिला विजय मध्ये काही चुकीच्या गोष्टी दिसल्या नाही किंवा दिसल्या माहित नाही पण group साठी, मैत्रीसाठी तिने त्याला होकार दिला.

प्रतिकेशला हे सगळ राम ने सांगितले आणि तो क्षणभरासाठी अवाकच राहिला..!

ज्या Group साठी ओवीने विजय ला होकार दिला तो,

Group त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुटला कारण प्रतिकेश जरी कधी बोलला नव्हता पण प्रियंका आणि नेहा ला विजय फक्त मित्र म्हणून च ठीक वाटत होता. तिने कोणाशी न बोलता घेतलेला तो decision कोणालाच नाही आवडला आणि ते सगळे वेगळे झाले.

ओवीने प्रतिकेश सोबत काही गोष्टी share करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने ऐकुन देखील घेतल पण फक्त ऐकुन घेतल कारण त्याच्या कडे आता दूसरा पर्याय नव्हता.

त्याने तिच्या आनंदासाठी तिला सोडल,

पुढे जाऊन प्रतिकेश आणि ओवी एकत्र आले कसे ते पुढील भागात कळेलच 🤙

Thursday 2 April 2020

QUARANTINE ची कहानी अर्थात कोरोनाची..!

कोरोना वाईट की चांगला ?

अर्थात मी विचारलेल्या प्रश्नाच उत्तर वाईट च असेल सगळ्यांच...

अमेरिका किंवा चीन च्या भांडणामुळे हा विषाणु पुर्ण जगात पसरला अश्या अफवा देखील कानावर आल्या.

चीन देशाने Bio Weapon म्हणून हा विषाणु तयार केला, अमेरिकेला याची भनक लागली आणि त्यांनी चीन ला ऑफर दिली की तो Bio Weapon आम्हाला द्या पण चीन ने नकार दिला नंतर अमेरिकेच्या Agents ने चीन मधून तो विषाणु Medical Scientist's कडून विकत घेतला आणि तो परत अमेरिकेला नेताना वुहान येथे फिश मार्केट मध्ये Shootout दरम्यान तो विषाणु पडला आणि कालांतराने पूर्ण चीन मध्ये पसरला..!

माहित नाही किती खर आहे किती खोट पण हे नको असलेल संकट देशावर आल पण पंतप्रधान
मोदिंनी घेतलेल्या Lockdown च्या निर्णयाच स्वागत करून भारताने कोरोनाला पळवुन लावण्यासाठी एकजुट केली..!



जेंव्हा बातमी आली की आता २१ दिवस भारत बंद राहिल तेंव्हा मित्रांकडून काही Interesting प्रतिक्रिया ऐकल्या मी,

आता २१ दिवस येवले चा चहा प्यायला नाही भेटणार,
दिवाळी पहाट रद्द होणार आहे,
रामनवमी ची मिरवणूक नाही होणार,
२१ दिवस हरियाली नाही बघता येणार,
बऱ्याच लोकांचे Birthday जाणार आहेत,
Chicken नाही खाता येणार,

मुलींच तर विचारूच नका त्यांना पाणीपुरी, वडापाव, मिसळ यांचीच आठवण येतेय तेच सुचतय 😂😂

पण मुलींच एक बर असत Msg लय येतात पोरांचे Tp तरी होतो 😂 मुल तर काय फुकट बसलेले असतात 😂

अजुन एक खुप लोकांनी काही ते बनवलय new year ला असत ना Resolution 😂

काही लोक करतात Continue काही लोकांचे एक दिवस टिकले तरी नशीब 😂 अर्थात मी सुद्धा त्यातलाच😁

पण खर तर कोरोना ने परिवार एकत्र आले,

खुप जुने मित्र परत एकत्र आले,

Facebook चे जुने फोटो परत वर आले 😂, (Trending)

काही हौसी लोक जेवण बनवत बसलेत,

काही लोक गावी जाऊन बोर होतायेत 😂😂

मला एवढं एक समजल की Hike वर natasha ला मोठा msg केला की ति Reply नाही देत 😂😂

खर तर त्यांच्या बद्दल बोलायला नको च 😂😂
#पळपुटे 😂

असो माझा वेळ मला Utilize करायला आवडतो म्हणून हे सगळ लिहल कोणाला दुखवायच नव्हतं कोणी दुखेल वाटत नाही तस 😂

QUARANTINE मुळे बोर होऊ नका काहीतरी शिकुन घ्या या एक month मध्ये,

This Thing Will Not Happen Again
नंतर सगळे reasons देतात वेळ नाही भेटत आता आहे आणि खुप आहे ✌️

#Stay_Home
#Stay_Safe ✌️

हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमा...