Friday 16 February 2018

ब्रेकअप पार्टी अर्थात प्रेमाची पुण्यतिथी.. ( भाग -१)



तुझं माझं नातं आता संपलंय.., आय एम सॉरी.., लिव्ह मी अलोन.., तू मला विसरणंच योग्य राहील दोघांसाठीही.., अशी न उमगणारी वाक्य धडाधड कानावर पडतात हल्ली, मग याला काय म्हणायचं.. प्रेमाचा ढेकर आला की ओकारी आली...
मग व्हॉटसअपच्या माध्यमातून मोबाईल नावाच्या इटुकल्या यंत्रातून गम-ए-जुदाईच्या मेसेजचा नुस्ता धबधबा वाहतो. त्यामुळे आम्ही सरावलो आहोत म्हणा. आणि हां वरचा माहोल पाहून समजू जातो, यंदा ब्रेकअप आहे... या जोडप्याचा.
गळ्यात गळे घालून तळ्यात पाय सोडून बसणारे, शोन्या, बाबू, पिल्लू, मनू, राजा, बाळा अशा प्रेमाच्या नावाच्या बारशावेळी पिझ्झा अन चॉकलेटरूपी घुगर्‍या वाटून ठेवलेल्या  नावाची एकदम किळस यायला लागते यांना, (जणू काही बर्गरमध्ये एखादी पाल निघाल्यासारखी..) कम्मालंय बुवा.. या लफडेवाल्यांची आय मीन प्रेमवीरांची.
काल-परवापर्यंत नात्यासाठी अधिर झालेली पोरं वर्षा-दोन वर्षांतच कशी बधीर झालीत, हे नागराज मंजुळे अन अजय-अतुलच काय पण कृष्ण-राधेलाही कळणार नाही. हे आम्ही चारचौघात सांगायला जातो तर.. ज्याने कधी तळ्यातील कमळं कमळीला सोबत घेऊन मोजली नाही, व्हॅलेंटाईन डेलाच कायपण फ्रेंडसशीप डेला सुद्धा ज्याचा हात सुना-सुना असतो (नवरा मेलेल्या बाईच्या कपाळासारखा). त्याने आम्हाला प्यार, इश्क, मोहब्बत शिकवू नये, असा टोमणा ऐकावा लागतो. त्यामुळे आम्ही तोंडघशी पडतो. पण शाहरूखने म्हणलेलंच हाय ना, कोई ना कोई चाहिए प्यार करने के लिए.. माझ्यासारख्या पोरींचा वारा न लागलेल्या माणसाला अशी गाणी धीर देतात. खरे तर लहानपणी अहंकाराचा वारा न लागो राजसा.. हा हरिपाठ सारखा म्हणल्यामुळेच आमच्या जवळपास कुणी फिरकत नाही...असं आमचा मित्र बबन्या विश्‍लेषण करतो.
प्रेमात पडल्यावर अनेक फ्रेंडस कवी झालेत, अन ज्याला हे जमलं नाही त्याच्या मदतीला सोशल मीडिया धावून आला, आपल्या कस्टमररूपी अशिलाची अब्रू वाचवालयला. कृष्णाने जशा द्रौपदीला एकापाठोपाठ एक साड्या दिल्या तशी व्हॉटसअपने अनेक प्रेम कविता पुरविल्या. प्रेमात वाहवलेले कवी देवदास होतात म्हणे पुढे. पण आता काही तशी सिच्युएशन नाही दिसत. क्योंकी अच्छे दिन आए है.. रिश्ता वही सोच नई, शेतकरी आत्महत्या करतात तशी जान देने की जरूरत नही. तू नही तो और सही और नही तो और सही... अशा आयडियालॉजीचा हा जमाना.. आमच्यासारखे लोक म्हणतील फालतू विचारसरणी आहे ही. पण याला म्हणायचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, रिश्ता वही सोच नई, नये जमाने की नई सोच..

No comments:

Post a Comment

Oh My Captain...!

  रोहित गुरुनाथ शर्मा..! आजचा विषय म्हणजे आपल्या लाडक्या कप्तान साहेबांचा वाढदिवस..!  Happiest Birthday to the Best Captain ❤️ 2013 ICC Cham...