Sunday 18 March 2018

एक होती ती अन् एक तो..( भाग -२ )

मागील भागावरून पुढे चालू 
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...
"सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे.
आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे.
खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.





तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं.
किती हळुवार होतं त्याचं मन.
मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!


मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच  आपला जीवनसाथी.
तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.
मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं!
चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले.
एखाद्या परीकथेसारखे.

खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं.
ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा!
आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या  कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही.
एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...

काही दिवसांनी ती सावरली.
रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.
एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.
त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.

"माझ्या प्रिये, मला माफ कर!

आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही...
केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती!

त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे.
आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती!
पण मला तु खुप आवडतेस...
आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो...

...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे  नाही तर हे खोटेपणाचं  ओझं मी पेलू शकणार नाही!

प्लीज - मला माफ करशील?"

1 comment:

  1. merit casino | Best Bitcoin & Payslot
    Best Merit 메리트카지노 검증 Casino Welcome Bonus: 100% up to $/€ 200 + 150 FS + 25 FS Welcome to Merit Casino! We have a fantastic online casino offering, so you can choose from a

    ReplyDelete

हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमा...