Wednesday 31 January 2018

चंद्रशेखर गोखले लेख


तिच्या लग्नाच्या रुखवताची आँर्डर त्याच्या बहिणीला मिळाली बहिणीने त्यालाच मदतीसाठी बोलावलं , बहिणीला मदत म्हणून तो गेला....त्याला नोकरी नाही म्हणून ती त्याच्याबद्दल घरी बोलू शकली नव्हती आणि आता तर तिचं लग्नच ठरलं होतं...
बहीण म्हणाली काहीतरी नवं करूया .....
त्याने रावळगाव चाँकलेटाच्या चांदीच्या बाहुल्या बनवल्या... बहिणीला हा प्रकार अगदी नवा वाटला तो मनात हसला ते दोघे भेटायचे तेंव्हा बोलता बोलता हातला चाळा म्हणून तो अशाच बाहुल्या करून तिला द्यायचा डोक्याचा पसरट भाग,दोन बाजूला पीळ देऊन बनवलेल्या दोन वेण्या आवळून तयार केलेला गळा आणि मग चांदी पसरवून केलेला बाहुलीचा फ्राँक... बहीण म्हणाली अशा अजून बाहुल्या बनव आपण त्याना फेर धरून नाचतायत असं दाखवूया... नवा अँटम ठरेल.. रुखवतात नवा अँटम असला तर चार पैसे अधीक मिळातात.. बहीण बोलत होती त्याच्या भोवती तिला करून दिलेल्या बाहुल्यानी कधीच फेर धरला होता... त्या बाहुल्या ती पण फार मायेनं जपायची भुवनेश्वराहून आणलेली शिंपल्याची डबी त्या बाहुल्या जपून ठेवायला वापरायची.. सव्वाशे बाहुल्या झाल्या की आपण लग्न करू अस ती म्हणायची.. सव्वाशे अडिचशे तिनशे किती बाहुल्या झाल्या मग तिने मोजणं बंद केलं आणि मग दोघांचं भेटणं ही बंद झालं
त्याच्या मनातल्या आठवणींप्रमाणे त्या बाहुल्या शिंपल्याच्या डबीत कायमच्या बंद झाल्या.
..बहीण खूप खूश होती म्हणाली तू असलास की मला काळजीच नसते... ती पण असच म्हणायची तू आहेस.. मला कसली काळजी?..ती खांद्यावर डोकं ठेऊन विसावली की तो सुखावायचा... अत्ता बसल्या बसल्या त्याचा एकाएकी खांदाच भरून आला... खरं तर ऊर भरून आला डोळे भरून आले गळा दाटून आला...आपण फूटून जाऊ असं त्याला वाटत असतानाच बहिणीचं त्याच्याकडे लक्ष गेलं, त्याची अवस्था बघून ती कासावीस झाली.काय होतय काय होतय म्हणायला सवडच मिळाली नाही कारण तेव्हढ्यात फोन वाजला त्याला थोपटत बहिणीने फोन घेतला... बरं झालं तेंव्हाच फोन आला त्याला स्वत:ला सावरायला,मोकळं व्हायला वेळ मिळाला, कधी कधी स्वत:च्या तावडीतूनही आपली सुटका करून घ्यावी लागते, त्याचं तसं झालं होतं , मी ठीक आहे म्हणत तो सावरून बसला जसं सगळं दाटून आलं तसच क्षणात निवळलं...
पण बहिणीचा मूड गेला तिच्या घरूनच फोन होता... तिचं लग्नं मोडलं होतं रुख्वताची आँर्डर रद्द झाली होती , पाच हजाराचं काम होतं वर हजार पाचशे ती जास्तं मिळवणार होती...सगळच बारगळलं
तितक्यात याचा फोन वाजला तिचा फोन होता तिने सांगितलं मी लग्न मोडलं , मी खूप विचार केला आणि शेवटी आई बाबाना सांगितलं मी सूखी होईन तर तुझ्या बरोबरच काय व्हायचं ते होऊदे... माझी तुझ्या सोबत पाठवणी करा.. बाबांचा नाईलाज झाला ते आता मुलाकडे हे सांगायला गेलेत आईला तर तू आधीपासूनच पसंत होतास... तुला आईने भेटायला बोलावलय संध्याकाळी नक्की ये..
त्याला काय करायचं कळेचना.. तो भराभर चांदीच्या बाहुल्याच करत सुटला... बहीण वैतागली म्हणाली आता याचा काय उपयोग आहे?...
जेंव्हा तिला याचा उपयोग कळेल तेंव्हा तिला किती आनंद होईल ना...

Monday 29 January 2018

आणि भारत सज्ज झाला 🙌

आणि भारत सज्ज झाला.....

14 महिन्याचं लेकरू कडेवर घेऊन ,
आपल्या 5 वर्षांच्या मुलीला हाताने ओढत,
7 वर्षाच्या मुलीच्या कडेवर बसलेल्या
3 वर्षाच्या मुलीला बिस्किटाचा घास भरवत,
ती 6 महिन्यांची पोटुशी माऊली,
अनवाणी पायाने, 'यावेळी मुलगाच होऊ दे!',असा नवस बोलण्यासाठी मंदिरात आली..!!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

गळ्यात ताईत आणि मनगटाला गंडा बांधला,
नाकात दोन दोन थेंब टाकून, परातीतल्या पाण्यात हात बुडवून, कावीळ उतरवली,
आणि सापाचे विष उतरवण्यासाठी मांत्रिक गाठला!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

मुलीच्या लग्नात 10 तोळे सोने आणि लाख भर हुंडा शेत विकून दिला, शिवाय तिचं बाळंतपण सुद्धा केलं!
बाळाच्या जावळाला बोकड कापून जेवणावळी घातल्या!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

बाई कमावते, नवरा दारूत उडवतो, रात्री पायाखाली तुडवतो.
तरीही वंशाचा दिवा हवा म्हणून सासू रुसून बसली!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

नापिकीला कंटाळून बाप हवालदिल झालाय! तंगड्या वर करून बसलेल्या मुलाच्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय! हळदीला डीजे नाही आणला तर लग्न नाही करणार म्हणते धाकटी मुलगी!
नांदवायचं नाही म्हणताहेत सासरचे, म्हणून घरी आली मोठी मुलगी..!!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

नव्या गाडीच्या नंबर प्लेटला लिंबू मिरची बांधली,
राहत्या घरातले स्वयंपाकघर पूर्वेचं पाडून पश्चिमेला बांधलं,
नावाच्या स्पेलिंगमध्ये एक्सट्रा लेटरही जोडून घेतलं
आता कुठे पोरगा बिनपगारी मास्तर म्हणून नॉन ग्रांट च्या शाळेत लागला

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

Monday 8 January 2018

सरकार


पोरांना उपाशी ठेवून बापाचं स्मारक,
घरच्यांना डावलून बनलोय शेजाऱ्याचे सेवक ,
बोली तर तुम्ही आमची बोलत नाही,
तुम्ही असाल राजे पण आम्ही तुम्हाला मानत नाही!

तुमच्या मतपेटया त्यात तुमचीच मत,
तुमच्या Event ला तुमचीच लोकं,
जाहिरातीमधेच दिसते प्रगती,
प्रत्यक्षात मात्र अधोगती..
तुम्ही असाल श्रीमंत पण
हा गरीब तुम्हाला मानत नाही..

Saturday 6 January 2018

ONE COMMON FRIEND

One Common Friend 😄


Common Man सगळ्यांनी ऐकल असेल च But Common Friend बद्दल पहिल्यांदाच वाचाल 😄

सगळ्यांना Common Man चे Problems तर माहितच आहेत आज एका Common Friend चे पण Problems समझून घ्या कदाचित सगळ्यांवर किंवा सगळ्यांसोबत अस होत असेल पण कधी कोणी Notice नसेल केल अथवा या बद्दल विचार नसेल केला 😄

काय असतो एक Common Friend ?

कधी कधी होत सगळ्यांच्या आयुष्यात आपला खास मित्र किंवा मैत्रीण आपल्याच दुसऱ्या मित्रा सोबत जास्त Close होतो काही लोक याच वाईट वाटून घेतात काही ना याचा जास्त फरक नाही पडत.

या बद्दल बोलायच झालच तर कोण किती दिवस वर्षापासून आपल्या सोबत हे महत्वाच नसत त्याला जरी वेळ नसेल Prioritise Change झाल्या असतील तर त्यात तुमची पण कदाचित कुठे तरी चुक असेल.

दोष देत बसण्या पेक्षा आपण काय करु शकतो याचा विचार करा 🙌🏻

हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमा...