Wednesday 8 April 2020

It's Not that simple..! (Part 1)


खुप दिवसापासून हा विषय डोक्यात चालू होता पण काही गोष्टी स्पष्ट होत नव्हत्या, आज पूर्ण विषय समझला आणि लिहायला घेतलचं❤️

मुल खरच प्रेम करतात का? हा अगदी सरळ, साधा पण खूप गंभीर असा प्रश्न आहे परंतु माझा असा प्रश्न आहे की मुली एखाद्याला होकार देण्याआधी विचार करतात का?

या कथेमध्ये एक कॉलेज मधील एक मित्र परिवार आहे. त्यात तीन मुली नेहा, ओवी आणि One of the common name प्रियंका, तसेच चार मुलं विजय, प्रियांश, राम आणि प्रतिकेश असे आहेत.

या group मध्ये एक couple होत - प्रियांश आणि नेहा, दोघांचीही फार जुनी ओळख अगदी शाळेपासुन छान चाललेल त्यांच.

कॉलेज मध्ये सगळेचं मित्र खरंतर खुप close असतात त्याला कारण एकचं ते म्हणजे रोज रोज भेटणं आणि मस्ती करणं, सहसा भांडण होत नाही. एकदा Bonding नीट असेल तर रोजचं यांच routine fix असतं. एक एक भन्नाट character असलेले सगळे एकत्र आले की एक छान मैत्री पाहायला मिळते आणि यांच सुद्धा काहीस असंच होत.

प्रत्येक ग्रुप मध्ये एकतरी रागीट मित्र असतोच अगदी तसंच राम ला सगळ्यात जास्त राग येतो अस सगळे बोलायचे पण खरतर ओवी चा राग म्हणजे खतरनाक होता आणि तिला विजय चिडवुन हैराण करायचा, त्याच असं म्हणण होत की,
'भाई मस्ती तर पाहीजेचं त्याशिवाय ते कॉलेज लाईफ कसलं' 
भन्नाट होता खरतर तो.

प्रियंका तिच्या नावाप्रमाणे not so interested type ची होती तुम्हाला हवं ते करा असं एकदम तिला कोणाचं काही पडलेलं नसायचं.

राहीलेला प्रतिकेश आशिक होता पण कोणाला माहित नसलेला, बोलायच म्हंटल तर एकदम छुपा रुस्तम आणि हो त्याच ओवी वर प्रेम सुद्धा होत बरं का पण फक्त त्याला आणि Building मधला त्याचा मित्र निनाद याला माहित होत. त्याला नेहमी वाटायच की आपली मैत्री खराब होईल एका निर्णया मुळे म्हणून तो गप्प होता.
त्याला आता खरच आपल्या प्रेमाबद्दल ओवीला सांगाव वाटल पण Friendship Day दिवशी ओवी ने त्याला खास मित्र म्हणून एक मोठा msg पाठवला आणि ते ऐकुन त्याला वाटल तिच्या मनात आपल्याबद्दल नसावं काही,

प्रतिकेशच्या घालमेल वर बोलायच झालं तर गुलजार यांच एक काव्य आठवत,

कदर कर, जता मत
फिक्र कर, दिखा मत
तु चाहता है की दोस्ती रहे
तो मोहब्बत कर, बता मत 🤙

त्याला मैत्री गमवायची नव्हतीच म्हणून तो गप्प बसला. पण त्याला काय माहित होत की उद्या त्याचाच मित्र विजय तिला Propose करेल आणि ओवी त्या दिवशी त्याला नाही बोलली आणि प्रतिकेश ने सुटकेचा श्वास घेतला.

काही दिवस त्यांचा तो Happy Group थोडा बिखरलेला वाटलाआणि ओवीला तिच्या Decision मुळे हे सगळं झालंय असं सारख वाटत होतं. तिला विजय मध्ये काही चुकीच्या गोष्टी दिसल्या नाही किंवा दिसल्या माहित नाही पण group साठी, मैत्रीसाठी तिने त्याला होकार दिला.

प्रतिकेशला हे सगळ राम ने सांगितले आणि तो क्षणभरासाठी अवाकच राहिला..!

ज्या Group साठी ओवीने विजय ला होकार दिला तो,

Group त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुटला कारण प्रतिकेश जरी कधी बोलला नव्हता पण प्रियंका आणि नेहा ला विजय फक्त मित्र म्हणून च ठीक वाटत होता. तिने कोणाशी न बोलता घेतलेला तो decision कोणालाच नाही आवडला आणि ते सगळे वेगळे झाले.

ओवीने प्रतिकेश सोबत काही गोष्टी share करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने ऐकुन देखील घेतल पण फक्त ऐकुन घेतल कारण त्याच्या कडे आता दूसरा पर्याय नव्हता.

त्याने तिच्या आनंदासाठी तिला सोडल,

पुढे जाऊन प्रतिकेश आणि ओवी एकत्र आले कसे ते पुढील भागात कळेलच 🤙

1 comment:

हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमा...