Friday 28 September 2018

वादक कलाकार ❤️💪


वादन भरपूर वेळा पाहील होत मी अस अंगावर काटा यायचा नेहमी,

ठरवल होत मनाशी हे करायच च..!


आधी सोप वाटल पण जेंव्हा मांड्या काळ्या निल्या पडल्या तेंव्हा मेहनत कळाली,

ति मेहनत सोडली तर दुनियाच बोलण वेगळच band मधे आहेस का ? पैसे किती भेटतात ? वैगरे वैगरे

कोण सांगेल त्यांना आमच ते मावा खात fiber वाजवणार नाहिये भाऊ, आम्ही परंपरा जपण्यासाठी वाजवतो ❤️💪
आजकालची पोरांना यातल काय कळत नाय म्हणून त्यांच काय आपण मनावर घेत नाय 😂


कोण काय बोलल तर सरळ एक च बोलायच ढोल कंबरेला बांधून फक्त थोड चालून दाखव भावा 😂
म कळेल त्याला 😂😂

त्यात घरचे तर कहरच करतात घरचा गणपती सोडुन कुठे चालला आता याच उत्तर नाहिये माझ्याकडे पण

जाउद्या

हाथी चले बाजार कुत्ते भौके हजार 🤘





हे अस क्षेत्र आहे जिथे केल तर सगळ भेटत पण हार मानली तर काहीच नाही..!

याच बरोबर जे अध्यक्ष पथकप्रमुख जे हे उभ करतात त्यांना खरच सलाम आहे., मी जवळुन पाहीलय किती मेहनत आहे ते,

सलाम भावानों..!


ताशा वादक जास्त करून All Rounder असतात, मी तरी पाहीलेत आमच्या ताशा वादकांना ढोल पण जमतो टोल पण जमतो राव..!

अन् हा,


मानाचे ध्वजधारी यांच्या शिवाय शोभा नाही म्हणून खरच फक्त ध्वजधारी नाही बोललो मान हातात ध्वज घेतल्यावर भेटलाच पाहिजे ✌️❤️


बघनाऱ्याना हे सगळ सोप वाटत कारण मी अनुभवलय ते मला देखील सोप वाटायच आधी पण जेंव्हा कंम्बरेला ढोल बांधला टिपरु घेतला की कळत..!

Saturday ला दिवसभर practice करून हाथ फाटलेले असताना Sunday ला परत 10 ला ढोल तानायची बारी येते ना तेंव्हा अस वाटेल नको हे सगळ झोपुया घरी जाऊन..!


Hat's Off आहे माझा त्या सर्व वादकांना ताशा सहित हे करण अवघड आहे..!

हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमा...