Monday 30 April 2018

मैंने पूछा चांद से...



मी पण विचारल त्या दिवशी फरक एवढाच की मी मराठी मध्ये विचारल 😛

तो म्हंटला नाही रे कोण नाय एवढं चांगल दिसत तुझ्या Gf पेक्षा,

मी तिला सांगितले ति पण खुश झाली ना राव 😍

संध्याकाळी एका मित्राला सांगितलं तर तो बोलला अरे मी पण विचारल होत मला पण हेच सांगितलं चंद्राने..

मला काही सुचेनास झाल्..

मी विचारल परत रात्री तर छान उत्तर दिल त्याने पण,

तुझी प्रियसी तुला आवडते ना म ति तुझ्यासाठी सगळ्यात सुंदर असणारच 😘

ति दिसत असो वा नसो पण ति तुझी Queen असणारच नेहमी ❤️


मी मनातच हसलो, खुश झालो, तिला फोन केला
Love uh म्हंटल खुप जास्त ❤️

काही ओळी त्या song च्या


Maine puchha chand se ke dekha hai kahee mera yar se hasin
Chand ne kaha, chandni kee kasam,
nahee nahee nahee
Maine puchha chand se...❤️

Monday 16 April 2018

आणि Ego मध्ये आला..


सुंदर अस कदाचित नजर लागाव अस त्यांच नातं होत बरोबर वाचलत होत 😞
तिनेच तोडल सगळ 🙂

त्याने तिच्या होकराची भरपूर वाट पाहिली आपल् प्रेम सिद्ध करून दाखवल म तिला हा बोलन्याऐवजी पर्याय नव्हता.
दोघांच एकमेकांवर खुप प्रेम होत कदाचित आहे आणि पुढे देखील असेल..

वाद सगळ्यांमध्ये होत असतात इथे देखील झाले खुप झाले पण वाद घातला किंवा भांडण केल म्हणून तिने नात तोडल नाही दोस्ता..
तिच्या जिवाला लागल त्याच वागण चुकुन का होईना पण 21 वर्षांचा घोडा झालता पण साध कळाल नाही..

सगळे वाट पाहत असतील नक्की काय झाल अस,



तर,

नेहमी प्रमाणे दोघ दिवसा कॉलेज मध्ये भेटली बोलले,
आप आपल्या घरी गेले,
कशावरुन तरी वाद झाले ( वादाच कारण सांगण किंवा मनाच सांगण मला बरोबर वाटत नाही कारण मला त्यातला काही Experience नाही 😝 )
तो खुप चिडला ति देखील चिडली अन् दोघांनी अवघ्या 10 वाजताच नेट बंद केल..
आजच्या काळात अस 10 वाजता नेट बंद करत का कोणी 😂
तिकडं त्याचा मित्र नाम्या ला त्याची काळजी वाटली अन् त्याने फोन केला त्याला सगळ ठीक आहे ना बाबा 😂😂

असो,
महत्वाच होत तिने नंतर त्याला msg केले पण त्याने पाहुन rply काय केला नाय..
तुम्हाला वाटत असेल बेन पुण्याच दिसतय किती तो राग 😂

ति तशीच झोपली,
सकाळ झाली तिने gud mrng .... msg केला पण त्याने काही rply दिल नाही..
काही वेळानंतर तिचे call आले त्याला पण त्याने ते देखील घेतले नाही 😢
तिने खुप call केले त्याने फोन च बंद केला 😅

त्या नंतर
त्या रात्रीपासून ति online आली नाही कारण त्याला देखील माहित नव्हतं
त्याने call केले तिला msg केले पण तिचा फोन बंद होता..
शेवटी प्रेम होत
तो घरी गेला तिच्या घर बंद होत आजुबाजुला चौकशी केली तर कळाल काही Emergency आलती Hospital मध्ये आहेत सगळे

इथे मात्र तो डगमगला स्वता:ला सावरत तो hospital मध्ये गेला, ति समोर दिसली जिवात जिव आला त्याच्या पण तिने विचारल फोन का घेतला नाही ?
तो बोलला रागवलेलो मी 😢
तिने एका वाक्यात एकच प्रश्न विचारला,
जर खरच मला काही झाल असत किंवा मला गरज लागली असती काही वाईट घडल असत तर ?

तो निशब्द उभा ऐकत होता
( पुणेकर असून ऐकत होता दाद देण्यासारखी गोष्ट आहे 😂 )

तिच्या प्रश्नाच उत्तर त्याच्या कडे नव्हतं अन् तिला नात तोडण्यासाठी खुप मोठ कारण होत..


सांगन्याच् कारण एवढंच तुमचा शत्रु देखील असेल तरी call उचलून एकदा पहा तो अडचनीत तर नाही ना..
आयुष्य खुप सुंदर आहे फक्त Ego लांब ठेवा  🙏

Tuesday 3 April 2018

तु कदाचित माझ प्रेम.. ❤️

खूप  वेळ  झाला  तरी  कागद  रिकामाच  होता...
मनात  असंख्य  विचार  गर्दी  करत  होते  पण  हाताला  काहीच  लागत  नव्हत. जणू  शिवा  शिवीचा  खेळच   खेळत  होते  माझ्यासोबत..
शेवटी  ठरवल डोळे  बंद  करून  जे  काही  समोर येईल  त्यावर  लिहायला  सुरवात  करायची... म  काय  नेहमी  प्रमाणे  तूच  जिंकलीस. आजही  माझ्या  डोळ्या  समोर तूच आलीस . मन  पुन्हा  एकदा तुझ्यात  हरवू  लागल. मी नाही नाही म्हणत असतांना देखील बेलगामपणे पुन्हा पुन्हा तुझाच पाठलाग करू लागलं.


       
आज  काल अस  काय  झालाय  की  माझ्या  मनात तुझ्याशिवाय  दुसर  कोणी  येतच  नाही  फक्त तू  तू  आणि  तू...
तू  माझी  नक्की  कोण  आहेस  याच  उत्तर  मला  अजून  उमगलेल नाही. मला  फक्त  एवढंच  माहितीये  मला  तुझ्यासोबत  जगायचय...
तु आयुष्याचा  प्रत्येक  क्षण  तुझ्यासोबत  घालवायचाय . तुझ्यात  आणि  तुझ्या  प्रेमात  मला  चिंब  भिजायचं, मला  तुझ्यात  हरवून  जायचंय...
तू  म्हणजे  मला  पडलेल  सगळ्यात  सुंदर  स्वप्न. तू  म्हणजे  माझ्या  मनाला  व्यापून  टाकणारी  एक  सुंदर  संध्याकाळ . कस  सांगू  तुला  कि  तुझ  माझं   असण  किती  छान आहे  नाहीतर  हे  जग  नुसताच  माणसाचं  रान  आहे...

हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमा...