Thursday 8 February 2018

गोष्ट त्याची

गोष्ट त्याची...

खर म्हटलं तर जवळच्याच एका मित्राची...सहज बोलून गेला तो आणि मला विचार करायला भाग पाडलं😀
त्याच्या नजरेतून...

एक मुलगी आवडायची पण माझ्यात हिम्मत नव्हती तिला जाऊन विचारण्याची, कारण भीती होती आहे ती मैत्री पण गमवण्याची😅
एके दिवशी जीव मुठीत धरून विचारलं तिला😅 नाही म्हणाली ती...वाटलं आता कदाचित एक नातं सुरु करण्यासाठी असलेलं नातं पण गमावुन बसलो मी😢
मी प्रयत्न सोडले नाहीत... थोड्या दिवसांनी परत विचारलं नकारच दिला तिने. पण या वेळेस मात्र तिच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे वेगळेच दिसले...थोड का होईना प्रेम दिसलं त्या नकारात😄
परत विचारावं वाटलं पण
सतत विचारण बर वाटत नव्हतं म्हणून थोडा थांबलो😀

दिवस सरत गेले...
तिला वाटलं असेल विसरला हा अन् मी पुन्हा एकदा विचारल...कदाचित या वेळेस असं काही केले की तिला रडू आलं अन् मला घट्ट मिठी मारून तिने होकार दिला..

कोणत तरी युद्ध जिंकल्या सारख वाटलं 😄

क्षणाभरात आनंद नाहीसा झाला जेंव्हा तिने एवढे दिवस नकार देण्याचे कारण सांगितले😢

माझ लग्न ठरलवयं घरच्यांनी आधीच😅 आवडतोस मला तु पण आता काही होऊ शकत नाही Sorry 😄
निशब्द उभा होतो 😶

म्हंटल घरी येऊन विचारेल मी तुझ्या. हा बोलले तर चांगल आहे नाहीतर मी समझेल तु कधी भेटलीच नव्हतीस😄

जे मनाला वाटेल ते बोलून टाकाव, वेळ निघुन जायच्या आधी...आणि एवढं बोलून निघुन गेला😄
कदाचित आजही त्याच्या मनात याच गोष्टीची सल असेल की मी माझ मन आधीच मोकळ केलं असतं तर ?😄

मनात आहे ते बोलून टाकावं बिनधास्त😀होकर नकार जे असेल ते स्वीकारता येईल🙌पण आयुष्यभर मनाला समाधान असेल की आपण प्रयत्न तरी केला😊☺️

No comments:

Post a Comment

Oh My Captain...!

  रोहित गुरुनाथ शर्मा..! आजचा विषय म्हणजे आपल्या लाडक्या कप्तान साहेबांचा वाढदिवस..!  Happiest Birthday to the Best Captain ❤️ 2013 ICC Cham...