Friday 9 February 2018

काय म्हणावं या बायकांना


नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला –
मी कसा दिसतो ते सांग
बायको म्हणाली —
मेघनादरिपु तात वधी ज्या नराला ।
ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला।
त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी।
तैसे तुम्ही दिसता मजला मनी।
आता बोला.
मला याचा अर्थ काही कळेना म्हणून मी एका विद्वान पंडिताला विचारलं तर त्यानी सांगितलेला अर्थ खाली देत आहे.
मेघनाद म्हणजे इंद्रजित, त्याचा अरि म्हणजे शत्रू कोण ?
तर लक्ष्मण (कारण लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केले होते) अशा लक्ष्मणाचा तात म्हणजे पिता कोण ? तर दशरथ.
दशरथाच्या हातून अजाणता कोण मारल्या गेला ?
तर श्रावणबाळ ( मराठी बारा महिन्यातील क्रमांक पाचवा महिना आहे श्रावण ) श्रावण महिन्याच्या अमावस्येला ( संहिता म्हणजे अमावस्या ) कोणता सण असतो ?
तर पोळा . पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची .( त्या दिवशी बैलाला सजवतात )
त्या सजवलेल्या बैलासारखे तुम्ही दिसत आहात.

आता बोला… काय म्हणावं या बायकांना

No comments:

Post a Comment

Oh My Captain...!

  रोहित गुरुनाथ शर्मा..! आजचा विषय म्हणजे आपल्या लाडक्या कप्तान साहेबांचा वाढदिवस..!  Happiest Birthday to the Best Captain ❤️ 2013 ICC Cham...