Thursday 6 February 2020

पहली नजर..!

काही महिने करिअर ब्रेक घेऊन कार्तिक पुन्हा जॉबला जाऊ लागला. बरेच नवीन चेहरे त्याला दिसले. भिन्न प्रकारचे. काही ताजे Refreshing, तर काही सडके.

Manager, lead आणि Management ही बदलले होते. कार्तिक च्या ग्रुप मधल्या दोस्तांनी Job ही बदलले होते ते त्याच कारणामुळे,

आधीच्या ग्रुप मधली श्रुतिका मात्र होती. मग कार्तिक तिच्याच मित्र मैत्रिणी च्या ग्रुप मध्ये शामिल झाला. तसा तो उनाड आणि फाझील होता त्यामुळे त्यांच्यामध्ये मिसळायला त्याला फार वेळ नाही लागला.


श्रुतिका ने सगळ्यांशी ओळख करून दिली. कार्तिक ला मस्त वाटली मंडळी. बिनदास्त मस्ती करणारी, हसणारी खिदळणारी, मन मोकळेपणाने गप्पा मारणारी, आणि एकमेकांना समजून घेणारी. कार्तिक ला ही अशी लोकं आवडायची, कारण तो स्वतःही तसाच होता. फुल ऑन टाइमपास करणारा. 

एवढं कि त्याची ०५ वर्षांपूर्वीची Girlfriend आणि आताची चांगली मैत्रीण त्याला आजही DDLJ च्या काजोल सारखी विचारते “तुम आखरी बार सीरीयस कब हुए थे”

 आणि कार्तिक त्या वर थंडी भरल्या सारखा खिदळतो,असो.

तर श्रुतिकाने अथर्व, सई, निखिल, रुची ह्यांची ओळख करून दिली श्रुतिकाने, 
आणि मग सफरचंद खाण्यात धुंद असलेल्या अनिशा शी माझी पहिली ओळख श्रुतिकाने करून दिली. अनिशा ने फक्त डोळ्यांच्या भोवया वर उडवत Hie म्हणायचा प्रयत्नं केला, बहुतेक. कार्तिकला ती तेव्हा थोडी उध्दट वाटली होती. 

त्याने पण फक्त मान होय नाही करत तिला Hie म्हटलं. पण असे भाव असूनही काही क्षण कार्तिक ला अनिशाच्या चेहऱ्यावरून नजर हटवता येत नव्हती. 

हे का होतंय हे त्यालाही  कळत नव्हतं. Love at First Site अश्या जगातला कार्तिक मुळीच नव्हता. प्रेम म्हणजे एकमेकांची मन आणि स्वभाव जाणून घेणं हेच होता. आणि अगदी अशीच नाती जास्त टिकतात अश्या मताचा कार्तिक होता खर.

कार्तिकचे पहिले दोन दिवस Laptop आणि अन्य औपचारिक कामात जात होता. दुसऱ्या दिवसाच्या दुपारी कार्तिक लॅपटॉपच्या Settings मध्ये busy असताना अनिशा अचानक त्याच्या Desk समोर आली. कार्तिकचे काही क्षण पुन्हा तिचा चेहऱ्यावर स्तब्ध झाले.

“अरे श्रुतिका एक Session घेतीये. You also Come. Invite send नाही करता आलं,” अनिशा म्हणाली.

“हो येतो,” कार्तिकचं उत्तर.

त्या वेळेला कार्तिकच लक्षं अनिशाच्या गळ्यातील मंगळसूत्रावर गेलं. काल ते तिच्या ओढणी खाली लपलं होतं.

कार्तिक अनिशा ला Follow करत Meeting रूममध्ये गेला.

श्रुतिका काहीतरी सांगत, शिकवत, Explain करत होती. पण कार्तिक लक्षं नव्हतं. जे होत ते अनिशाच्या मंगळसूत्राकडे,

मधेच अनिशाने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने लगेच नजर चुकवली. बेचैन व्याकूळ होऊन कार्तिक दोन्ही हाथांची बोटं एकमेकात घट्ट धरून बसून होता. नक्की त्याला ही कळत नव्हतं काय होतंय. तेवढ्यात उजव्या हाताच्या चौथ्या बोटातील अंगठीचा स्पर्श कार्तिकच्या डाव्या हाताच्या बोटांना झाला. त्याने मनाला मग थोडंस आवारत घेतलं. 
पण त्या अंगठीच्या स्पर्शाची जाणीव आता त्याच्या हृदयाला मात्र होत नव्हती. 
पण त्याला तेव्हाही कळत नव्हतं की नक्की सगळं काय चाललं होतं.

1 comment:

हे ही दिवस जातील..!

साधारण ३ ४ महिन्यांपूर्वी आपल्याला कोरोना, क्वारंटाइन, लॉकडाउन हे शब्द माहित देखील नव्हते पण परिस्थिती आणि बातम्यांच्या कृपेने दिवसातुन किमा...