Monday 10 February 2020

Almost Done but,



कॉलेज लाईफ हि सगळ्यांनीच पाहिलेली असते, सगळ्यांना कोण तरी आवडतचं असतं पण सगळ्यांना ते वक्त करता येत नाही.
हा काही लोक करतात काही आयुष्यभर मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवतात आणि म्हणूनच नंतर तिच्या लग्नाला जातात...!

कॉलेज मध्ये असताना माझा ही एक मित्र होता कार्तिक. त्याला अनिशा खुप आवडायची अर्थात सवयी माहित नव्हत्या कारण कॉलेज आता च सुरु झालेल. तरीही मुलं बोलतातच आवडते मला का कोणास ठाऊक कदाचित अनिशा दिसायला छान होती म्हणून असाव.

१-२ महिन्या मध्ये दोघ एकमेकांशीछान बोलू लागले, हळूहळू मैत्री खुलत गेली आणि सगळ्यांना वाटल जमल राव आता,
असेच काही महिने गेले आणि अखेर तो दिवस आला Propose Day आणि ते दोघ date वर गेले.

मी काही दिवस कामानिम्मित्त बाहेर गेलो असल्याने आल्यावर त्याला त्याला सहजचं विचारल कस चाललय Relationship,

त्यावर त्याने "अरे मी विचारलचं नाही भावा" असं उत्तर दिलं.

म्हंटल का अरे ?

अरे ती Bike वर होतो तेंव्हा बोलली Cafe मध्ये चल Latte प्यायचीये, तिच्या इच्छेचा मान ठेवत मी तिला घेऊन गेलो.

नंतर मी विचारल तिला टपरी आहे एक चहा पिऊ मस्त तर बोलली,
I Just Hate Chai

मग काय बोललास ??? मी Tension मध्ये विचारल,

काय नाय भावा काय बोलणार जी माझ्यासोबत चहा नाही पिऊ शकत ती आयुष्यभर काय साथ देणार...

मी रिक्शा थांबवली म्हंटल जा ताई तु घरी..!

चहा बद्दलच प्रेम नाही तर "We are made for Each Other" वाला Dilouge कसा बोलणार मी.

आणि तिला विचारायचं राहूनच गेलं🤗

No comments:

Post a Comment

Oh My Captain...!

  रोहित गुरुनाथ शर्मा..! आजचा विषय म्हणजे आपल्या लाडक्या कप्तान साहेबांचा वाढदिवस..!  Happiest Birthday to the Best Captain ❤️ 2013 ICC Cham...